केनिया | केनियामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वैद्यकीय दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली होती. डॉक्टरांनी ज्या व्यक्तीला मृत घोषित केले होते ती व्यक्ती चक्क उठून बसली आणि रडू लागली. धक्कादायक म्हणजे जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरातून रक्त काढून घेतले जात होते.
पीटर किगेन असं त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचे वय ३२ वर्षे आहे. पोस्टमार्टेम करताना त्याचा पाय कापला जात होता आणि तो अचानकच शुद्धीवर आला. त्याला पोटाचा आजार होता त्यामुळे तो त्रस्त होता. त्याला केरिको येथील कॅपलेटेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
मात्र त्याच्या भावाच्या म्हणण्यानुसार त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. त्याने एका वृत्तवहिनीला मुलाखत दिली आहे. नर्सने मृतदेहाला शवागरात नेण्याआधी माझ्या हातात कागदपत्रे दिली होती. तिथे त्याच्या पोस्टमार्टेमची प्रक्रिया सुरू झाली.
पण पोस्टमार्टेमच्या आधी कर्मचारी त्याच्या अंगातून रक्त काढत होते तेव्हा तो जिवंत झाला. त्याला असह्य वेदना होत होत्या त्यामुळे तो रडत होता. एक मेलेला व्यक्ती जिवंत कसा झाला हे पाहून तिथले कर्मचारी पळून गेले.
थोड्यावेळाने त्याला पुन्हा प्रथमोपचार करण्यासाठी नेण्यात आले. पीटरचा भाऊ म्हणाला जिवंत व्यक्तीला ते मृत घोषित करून कसे काय पोस्टमार्टेम करू शकतात? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात तक्रार केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनावरील लस कधी मिळणार? डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितली वेळ
महावीर शाह एक असे अभिनेते ज्यांच्या मृत्यूने सगळ्या फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला होता