आश्चर्यच! सहा वर्षाच्या मुलाला डॉक्टरांनी केले मृत घोषित; आईने हाक मारताच मुलगा झाला जीवंत

डॉक्टरांनी मृत सांगितलेला व्यक्ती जीवंत झालेल्याच्या अनेक घटना तुम्ही बघितल्या किंवा ऐकल्या असतील. आता अशीच एक घटना घडली आहे. डॉक्टरांनी मृत घोषित केलेला मुलगा आईच्या एका हाकेने जीवंत झाल्याचा एक प्रकार पाहायला मिळाला आहे.

टायफायईडमुळे मुलाचा मृत्यु झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तसेच तो मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला होता. घरी आल्यानंतर आई मृतदेहाजवळ मोठमोठ्याने रडू लागली. त्यावेळी तिने मुलाचा हातात हात घेतला आणि त्याला उठण्यासाठी विनंती करु लागली.

मोठमोठ्या हाका मारत असतानाच आईला मुलाच्या चेहऱ्यावर बांधलेल्या कपड्यात हालचाली जाणवू लागल्या आणि सर्वचजण चकित झाले. तोंडावरचे कापड काढल्याने हालाचाली वाढू लागल्या. त्यामुळे लोकांनी त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.

तेव्हा डॉक्टरांनी त्या मुलाची जगण्याची शक्यता १५ टक्के असल्याचे सांगितले होते. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि आता तो पुर्णपणे बरा झाला आहे. संबंधित घटना हरीयाणाच्या किला परीसरामध्ये घडली आहे. त्या सहा वर्षीय मुलाचे नाव कुणाल असे आहे.

मुलाची हालचाल दिसून आल्याने त्याला श्वास घेण्यासाठी त्याच्या तोंडात हवा फुकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुणालने त्यांच्या ओठांचा चावा घेतला. पण जखमपेक्षा मुलाचे जीवंत होणे महत्वाचे होते.

त्यामुळे त्याचे कपडे काढले आणि त्याच्या छातीला जोरजोरात दाबण्यास सुरुवात केली. हालचाली वाढल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि तो आता पुर्णपणे ठिक आहे. आई-वडिलांना त्यांचा मुलगा पुन्हा मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO:जिम सुरु होताच पुण्याच्या डॉक्टरबाई जिममध्ये दाखल, साडीवरच केला ‘झिंगाट’ वर्कआऊट
वडील घरी उशिरा येत असल्यामुळे रागवलेली मुलीचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?, पहा व्हिडीओ
बी.आर. चोप्राच्या ‘महाभारता’तील कुंती आठवते का? जाणून घ्या आज काय करते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.