Share Market : शेअर बाजार ही अशी गोष्ट आहे ज्यात एखादा गुंतवणूकदार खूप उंचावर जाऊन पोहोचतो तर एखाद्याचे खायचेही वांदे होतात. शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे अनेकांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत तर अनेकांनी तेवढेच गमावलेही आहेत. मात्र, आता एका शेअरने १५ दिवसात दुप्पट पैसे केले आहेत.
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेअरबाजारात कमी दिवसात दुप्पट पैसे करायचे असल्यास हा लेख वाचा. यात आम्ही तुम्हाला १५ दिवसांत दुप्पट पैसे केलेल्या शेअरबद्दलची माहिती देणार आहोत.
डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस (DCM Financial Services) या शेअरने आपल्या गुंतवणूकदाराला गेल्या पंधरा दिवसात तब्बल १०१ टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच १५ दिवसांपूर्वी या शेअरमध्ये ज्याने एक लाख रुपये गुंतवले असतील, त्याचे आता दोन लाख झाले असतील.
या डीसीएमच्या शेअर्सची आठवड्याभरातील कामगिरी पाहिली तर त्यात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच यात एका महिन्यात सुमारे ८५ टक्के वाढ झाली होती. यासोबतच या शेअरने एका वर्षात २०६.५२ टक्के आणि गेल्या ३ वर्षांत ८६५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
या शेअरच्या किमतीत आज तब्बल ४.४४ टक्के तेजी पाहायला मिळाली. शेअर मार्केट बंद झाल्यावर या शेअरची किंमत आज ७.०५ रुपयांवर पोहोचली आहे. तसेच या शेअरच्या किमतीत गेल्या पाच दिवसांत १९.४९ टक्के तेजी पाहायला मिळाली आहे.
या शेअरची किंमत गेल्या महिनाभरापूर्वी ३.६० रुपये होती. त्यांनतर एक महिन्यात हा शेअर जवळपास ९५.८३ टक्क्यांनी वाढलेला पाहायला मिळाला. हा शेअर ३.४५ रुपयांनी वाढला आहे.
महत्वाच्या बातम्या
Satara : आता राजेच राजांचा कडेलोट करणार? साताऱ्याच्या दोन्ही राजांमधील चिघळलेला वाद पोहचला कडेलोटापर्यंत
Vani: तब्बल २ हजार किलोचा शेंदूर हटवला, समोर आले सप्तशृंगी देवीचे मूळ रूप; फोटो पाहून भारावून जाल
Nashik: नाशिकमधील ७ लहान मुले गायब, खरी माहितीसमोर येताच पोलिसांसहीत सगळेच हादरले
चार दिवस अतिवृष्टी; राज्यात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; पाहा हवामान खात्याचा अंदाज