दयाबेनला पागल औरत म्हटल्यावर जेठालाल अडकले वादाच्या भोवऱ्यात, वाचा पुर्ण किस्सा

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. इतकी वर्षे झाली तरी या मालिकेची टीआरपी काहीच कमी झालेली नाही. अजूनही या मालिकेचे चाहते तितकेच या मालिकेवर प्रेम करतात.

लहान मुले आणि मोठ्यांनाही या मालिकेचे प्रचंड वेड आहे. गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दयाबेन, जेठालाल, बबीता जी, भिडे इ. पात्र आज आपल्या जीवनाचे एक भाग बनले आहेत.

मालिकेतील प्रत्येक पात्र आणि डायलॉग प्रेक्षकांना खुप आवडतात. पण तुम्हाला कदाचित माहित नसेल त्यातील एका डायलॉगमुळे जेठालाल वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. तो डायलॉग कादाचित तुम्हाला माहित असेल.

जेठालाल यांचा हा खुप फेमस डायलॉग आहे. ए पागल औरत हा तो डायलॉग होता. तेव्हा या डायलॉगवरून अनेक मीम्स व्हायरल झाले होते. या डायलॉगमागे दडलेला एक किस्सा जेठालाल यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे.

ते एक पॉडकास्ट होतं. त्यांनी त्या पॉडकास्टमध्ये सांगितले की, तो डॉयलॉग स्क्रीप्टमध्ये नव्हताच. मी स्वता तो डायलॉग ऍड केला होता. पुढे ते म्हणाले की, सेटवर परिस्थिती अशी होती की दया तिचे डायलॉग बोलत होती आणि तेवढ्यात माझ्या तोंडातून ए पागल औरत हा डायलॉग निघून गेला.

परंतु त्यानंतर महिलांनी माझा विरोध केला होता. कोणत्याही महिलेच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. असं जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांनी या पॉडकास्टमध्ये सांगितले आहे. दरम्यान, २००८ पासून ही मालिका सुरू आहे.

सोनी सब या चॅनलवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. जुलै २००८ मध्ये ही प्रथम प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही मालिका एका साप्ताहिक कॉलमवर आधारित आहे जिचे नाव आहे दुनिया ने ऊंधा चष्मा.

महत्वाच्या बातम्या
पंड्या बंधूंचे कौतूकास्पद काम; देशातील ग्रामीण भागासाठी दिले तब्बल २०० ऑक्सिजन संच
एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री होती रणवीर सिंगची आजी; पहा फोटो
आसाममध्ये भाजपकडून काँग्रेस भूईसपाट; सलग दुसऱ्यांदा भाजपने केली सत्ता काबीज
‘या’ आहेत बॉलीवूडच्या सर्वात कमी शिकलेल्या अभिनेत्री; एक तर आहे फक्त पाचवी पास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.