चाहत्यासांठी खुशखबर! तारक मेहतामधील ‘दयाबेन’ आता पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध मालिकांमधले एक नाव म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशात महत्वाच्या भुमिकेत असणाऱ्या दयाबेन म्हणजेच दिशा वकानी या मालिकेतुन बाहेर पडल्या होत्या.

तारक मेहता या मालिकेत दिशा वकानी पुन्हा दिसून येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही मालिका आता ऍनिमेटेड स्वरुपात येणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच दयाबेनचे नवे रुप पाहायला मिळणार आहे.

या कार्यक्रमाच्या पहिल्या झलकचा व्हिडिओ सोनी टीव्हीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये जेठालाल, टप्पु, बाबूजी आणि दयाबेन हे सर्व पात्र ऍनिमेटेड स्वरुपात दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आता चाहत्यांमध्ये या ऍनिमेटेड मालिकेची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, २०१७ मध्ये गरोदर असल्यामुळे दिशाने मालिकेतून ब्रेक घेतला होता. पण त्यानंतर ती पुन्हा दिसून आली नाही. असे म्हटले जात तिने मानधनामुळे ही मालिका सोडली होती. दिशा मालिकेच्या एका भागासाठी १.२५ लाख रुपये घेत होती, पण तिने आता १.५० लाख रुपये एका भागाला अशी मागणी केली आहे.

तसेच मुलीला वेळ देता यावा, यासाठी तिने ११ ते ६ अशी निश्चित वेळ सांगितली आहे. पण दिशाच्या या मागण्या शोमेकर्सने अजूनतरी मान्य केलेल्या नाही. त्यामुळे दिशा मालिकेत दिसत नाही. सध्या या मालिकेत दिशा नसल्यामुळे तिचे चाहते खुप नाराज आहेत.

महत्वाच्या बातम्या-

फ्लाईटमध्ये दारु पिऊन टल्ली झाली होती प्रियंका चोप्रा; त्यानंतर तिने जे केले ते ऐकून धक्का बसेल

घृणास्पद! ढाब्यात थुंकून बनवली जात होती रोटी, पोलिसांनी कुक आणि मालकाला केली अटक

कोरोना रुग्णांना टरबूजातून खर्रा आणि पार्सलमधून दिली जातेय दारू; नातेवाईकांचा प्रताप

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.