दया भाभीने सांगितला पहिल्या पगाराचा किस्सा; म्हणाली…

इंडियन टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ला तेरा वर्ष पुर्ण झाली आहेत. आजही तरीही हा शो सर्वात सर्वात पुढे आहे. एवढ्या वर्षांनंतर देखील हा शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

ह्या कार्यक्रमातील सगळे कलाकार खुप प्रसिद्ध आहेत. प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. आजही लोकांना या कार्यक्रमातील कलाकार आवडतात आणि त्यांचा अभिनय आवडतो.

असेच एक पात्र या मालिकेमध्ये दिशा वकानी यांनी निभावले आहे. हे पात्र आहे दयाभाभीचे ही भुमिका देशातील प्रत्येक एक ठिकाणी गाजली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या कार्यक्रमापासून दुर आहेत. पण त्यांचा चाहता वर्ग कमी झाला नाही.

दिशा यांचा जन्म गुजरातमधील एक जैन परिवारामध्ये झाला होता. त्यांचे वडील एका थेटर ग्रुपचे मालिक आहेत. याच कारणामुळे दिशा यांच्यावर लहानपणापासून अभिनयाजे संस्कार झाले आहेत.

बालकलाकार म्हणून त्यांनी नाटकामध्ये काम केले आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनयामध्ये डिग्री घेतली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या नाटकांमध्ये काम केले आहे.

आपल्या आवाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या दया भाभी सध्या अभिनयापासून दुर आहेत. पण त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात.

एका मुलाखतीमध्ये दिशाने तिच्या पहिल्या पगाराबद्दल खुलासा केला आहे. दिशा म्हणाली की, ‘कॉलेजमध्ये असताना त्यांनी एका व्यवसायिक नाटकात काम केले होते. त्यावेळी त्या नाटकासाठी त्यांना २५० रुपये मिळाले होते’.

दिशाने मिळालेले पैसे वडिलांना दिले होते. वडिलांनी ते पैसे अजूनही खर्च केले नाहीत. त्यांनी ते पैसे फ्रेम करून ठेवले आहेत. हे सांगताना दिशा भावनिक झाली होती. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

२५० रुपयांपासून सुरुवात करणाऱ्या दिशा आज करोडो रुपये कमवत आहे. सध्याच्या घडीला त्या करोडोंच्या संपत्तीच्या मालकीण आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

उर्मिला मातोंडकरमुळे झालता राम गोपाल वर्माचा घटस्फोट; बायकोने उर्मिलाच्या कानाखाली वाजवली होती

‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पागल झाले होते प्रभूदेवा; पत्नी आणि तीन मुलांना सोडून तिच्यासोबत राहत होते

पलंगावर झोपल्यामूळे मिथून चक्रवर्तीची झाली होती धुलाई; वाचा पुर्ण किस्सा

सुशांत प्रकरणी भुंकनारे कुत्रे आता शांत झालेत; बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा कंगणावर निशाना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.