भोळ्या भाबड्या दयाभाभीने ‘बी’ ग्रेड चित्रपटांमध्येही काम केले आहे; सीन पहाल तर शाॅक व्हाल

इंडियन टेलिव्हिजन एकच अशी मालिका आहे. ज्या मालिकेला संपूर्ण परिवार एकत्र बसून बघू शकतो. हि मालिका आहे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’

या मालिकेने देशासोबतच बाहेर देशात देखील प्रसिद्धी प्राप्त केली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र खुपच खास आहे. पण काही पात्र खुप प्रसिद्ध आहेत.

असेच एक पात्र या मालिकेमध्ये दिशा वकानी यांनी निभावले आहे. हे पात्र आहे दयाभाभीचे ही भुमिका देशातील प्रत्येक एक ठिकाणी गाजली आहे.

सध्या त्यांच्या टेलिव्हिजनवरच्या कमबॅकसाठी अनेक चर्चा सुरू आहेत. चला तर मग जाणून घेऊया दयाबेन म्हणजेच दिशा वकानीबद्दल

दिशा यांचा जन्म गुजरातमधील एक जैन परिवारामध्ये झाला होता. त्यांचे वडील एका थेटर ग्रुपचे मालिक आहेत. याच कारणामुळे दिशा यांच्यावर लहानपणापासून अभिनयाजे संस्कार झाले आहेत.

बालकलाकार म्हणून त्यांनी नाटकामध्ये काम केले आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनयामध्ये डिग्री घेतली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या नाटकांमध्ये काम केले आहे.

कमाल पटेल आणि धम्माल पटेल, लाली लीला असे अनेक नाटके केली आहेत. गुजरातमध्ये त्या खुप प्रसिद्ध झाल्या होत्या. पण या कालावधीमध्ये त्यांचे कुटुंब मुंबईला शिफ्ट झाले.

यानंतर दिशा वकानी यांनी बॉलीवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण त्यांना यश मिळत नव्हते. १९९७ साली दिशा वकानी यांनी एक ‘बी’ ग्रेड चित्रपट केला.

हा चित्रपट होता ‘कमसीन – द अनटच’ या चित्रपटामध्ये दिशा यांनी खुप वेगळी भुमिका निभावली आहे. अनेक बोल्ड सीन देखील दिले होते.

त्यानंतर दिशा वकानी बॉलीवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसल्या. त्यांनी ‘देवदास’ या चित्रपटामध्ये एक छोटी भुमिका निभावली आहे. अमीर खानसोबत ‘मंगल पांडे’ या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केले आहे.

त्यानंतर त्यांनी ‘जोधा अकबर’ या चित्रपटामध्ये भुमिका निभावली होती. पण आत्तापर्यंत त्यांनी निभावलेल्या सगळ्या भुमिका छोट्या होत्या.

पण २००८ मध्ये त्यांचे नशीब बदलले. त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांना सांगितले की असित मोदी एक नवीन मालिका घेऊन येत आहेत. त्यात त्यांना मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री हवी आहे.

दिशा यांनी या मालिकेची ऑडीशन दिली. या मालिकेसाठी त्यांची निवड झाली. ही मालिका होती ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ अशा प्रकारे त्या बनल्या दया भाभी

या पात्राबदल बोलायचे झाले तर दया भाभी टेलिव्हिजनवरच्या सुपरस्टार आहेत. त्यांचे करोडो चाहते आहेत. त्या या मालिकेमूळे खुप प्रसिद्ध झाल्या.

या मालिकेमध्ये दया भाभी यांची बोलण्याची एक खास पद्धत आहे. त्या मोठ्या मोठ्या आणि ओरडून बोलत असतात. पण हा दिशाचा खरा आवाज नाही.

दिशा जेव्हा नाटकांमध्ये काम करत होत्या. तेव्हा त्या माईक नसेल त्या ठिकाणी अशा पध्दतीने बोलायच्या. तीच गोष्ट त्यांनी या मालिकेसाठी केली आणि ती सुपरहिट ठरली.

या मालिकेमध्ये सुंदर यांनी दया भाभीच्या भावाची भुमिका निभावली आहे. पण तुम्हाला माहित आहे का दया भाभी आणि सुंदर हे दोघे खऱ्या आयुष्यात देखील भाऊ बहीण आहेत.

त्या टेलिव्हिजनवरच्या सुपरस्टार आहेत. २०१५ मध्ये त्यांनी मुंबईतील आकाउंटंट मयुरसोबत लग्न केले. पण २०१७ मध्ये टेलिव्हिजनला खुप मोठा झटका बसला.

२०१७ मध्ये दिशा यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी मालिकेमध्ये परत येण्यासाठी अनेक अटी आणि नियम ठेवले. जे निर्मात्यांनी मान्य नव्हते.

या गोष्टीवर गेले अनेक दिवस वाद आहेत. २०१७ नंतर दिशा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेमध्ये दिसल्या नाहीत. त्यांचे फॅन्स त्यांची वाट बघत आहेत.

महत्वाच्या बातम्या
एकनाथ खडसेंच्या भेटीबाबत शरद पवारांनी केला खुलासा
स्मार्टफोनच्या किंमतीत मिळत आहेत हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना; किंमत फक्त…
बाॅलीवूडचा सर्वात यशस्वी खलनायक महेश आनंदचा मृतदेह दोन दिवस सडत पडला होता..
भरातलं करीअर सोडून विनोद खन्ना ओशो आश्रमात का गेले होते? अखेर मुलगा अक्षयने केला खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.