‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोमध्ये दया भाभीच्या कमबॅकवर परत एकदा प्रश्नचिन्ह कारण…

गेल्या अनेक वर्षांपासून टेलिव्हिजनवर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शो राज्य करत आहे. या मालिकेची प्रसिद्धी खुप मोठ्या प्रमाणावर आहे.
टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चालणाऱ्या मालिकांमध्ये या मालिकेचे देखील नाव येते.

हि मालिका गेले बारा वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहे. टेलिव्हिजनवर खुप कमी मालिका एवढा काळ चालतात. या मालिकेने आत्ता तेराव्या वर्षात पदार्पण केले आहे. हि मालिका नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.

पण सध्या या मालिकेला आणि प्रेक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मालिकेत दया भाभीची भुमिका निभावणारी अभिनेत्री दिशा वकानी गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेतून गायब आहे. त्यामुळे प्रेक्षक अनेक वेळा निर्मात्यांना दया भाभी परत कधी येणार असा प्रश्न विचारत असतात.

गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षक हा प्रश्न विचारत आहेत. पण आजपर्यंत या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळाले नाही. आपल्या अतिशय यशस्वी करिअरला सोडून दिशा तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. दिशाने २०१७ मध्ये मुलगी स्तुती पाडियाला जन्म दिला होता.

दिशाची मुलगी तीन वर्षांची झाली आहे. आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोडून दिशा कामावर यायला तयार नाही. दिशाने २०१५ मध्ये मयूर पाडियासोबत लग्न केले होते. लग्नानंतर देखील दिशा काम करत होती. दया भाभीची भुमिका ती अतिशय उत्तम पद्धतीने निभावत होती.

पण २०१७ मध्ये दिशा वकानी गर्भवती होती. त्यामुळे ती सुट्टीवर होती. २०१७ मध्ये दिशाने तिच्या मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर प्रेक्षक ती ब्रेकवर होती. पण प्रेक्षक मात्र तिची वाट बघत होते. त्यांना वाटले होते की, मुलीच्या जन्मानंतर दिशा काही दिवसांमध्ये शोमध्ये परत येईल.

आत्ता शोपासून दुर होऊन दिशाला तीन पेक्षा अधिक वर्ष झाली आहेत. पण तरीही ती अजून परत आली नाही. शोचे निर्माते असित मोदी आणि त्यांची पुर्ण टिम दया भाभीची वाट बघत आहेत. दया भाभी परत कधी येणार हा प्रश्न त्यांना रोज विचारला जातो.

पण दिशाने मात्र तिच्या कमबॅकवर पुर्णविराम दिला नाही. असे बोलले जाते की, आई झाल्यानंतर दिशाने तिच्या फिसमध्ये वाढ करून एक करोड करायला सांगितले होते. त्यासोबतच निर्मात्यांसमोर अनेक अटी देखील ठेवल्या आहेत. निर्मात्यांनी सुरुवातीला या गोष्टीला नकार दिला होता.

नंतर मात्र त्यांनी दिशाच्या सगळ्या अटी मान्य केल्या होत्या. पण तरीही दिशाने तिच्या कमबॅकवर अजूनही काही उत्तर दिले नाही. ती परत कधी येणार याचे उत्तर कोणाकडेही नाही. निर्माते दिशाला परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत.

त्यासोबतच दिशाची फिस देखील वाढवण्यात आली आहे. पण एवढे दिवस वाट बघितल्यानंतर असे बोलले जात आहे की, दिशाने मुलीसाठी तिचे करिअर सोडून दिले आहे. ती परत कधीच अभिनय क्षेत्रात येणार नाही. पण निर्माते मात्र तिला परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून दयाच्या कमबॅकवर परत एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बॉलीवूडच्या ‘या’ ब्युटीसोबत युवराज सिंगला करायचे होते लग्न पण….

अक्षय खन्नासोबत बॉलीवूडमध्ये लाँच झालेली ‘ही’ अभिनेत्री आज कुठे आहे

मराठी फिल्म इंडस्ट्रीतले हास्य सम्राट अशोक सराफ यांना मामा कोणी बनवले ?

मोहब्बतें चित्रपटातील प्रीती झंगियानी आता दिसते अशी, फोटो पाहून वेडे व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.