दाऊद नाव केवळ मुस्लिमांमध्येच नाही तर मराठ्यांमध्ये देखील आहे!! प्रवीण दरेकरांचे वक्तव्य

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नावावरून वाद सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या जातीचा दाखला खोटा असल्याचे देखील मलिक यांनी म्हटले आहे. त्यांनी खोटा दाखला दाखवून नोकरी मिळवली असल्याचे देखील म्हटले आहे.

आता या आरोपानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, नवाब मलिक यांनी जातीवाचक, व्यक्तीगत राजकारण करु नये. दाऊद नाव केवळ मुस्लिमांचेच आहे का ? मराठ्यांमध्येही आहेत, असेही ते म्हणाले.

तसेच तपास यंत्रणा, न्याय व्यवस्था कारवाई करेल. नवाब मलिक केवळ हवेत गोळीबार करतात. नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी अनेकांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढले. तसेच गैरमार्गाने पैसे कमवले, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

दरेकर म्हणाले, अनिल देशमुख किंवा परमबीर यांना कायदा समान आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा. परमबीर सिंह आमचे काही लागतात का?, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. असे असले तरी दरेकरांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

तसेच त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत देखील शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, शरद पवार म्हणतात, चर्चेतून मार्ग काढा, पण चर्चा ही फक्त दिखाव्यासाठी आहे. कोणतीही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत.

सरकारकडे ठोस ऊपाय नाही. मुद्यावर चर्चा नाही, केवळ बनाव केला जातोय. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काहीतरी तोडगा काढावा लागेल. हजारोंच्या संख्येनं कर्माचारी रस्त्यावर आहेत. हा अहंकाराचा विषय केला आहे, असेही ते म्हणाले. यामुळे आता तोडगा कधी निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.