‘सुर्यवंशी’ चित्रपटावर भडकली दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड, म्हणाली, चांगल दाखवता येत नसेल तर..

नुकताच प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशी’ हा बॉलीवूड चित्रपट लोकांनी मोठ्या प्रमाणात पसंत केला  आहे. त्याचबरोबर काही लोक चित्रपटाच्या आशयाला टार्गेट करत आहेत, तर काही चित्रपटाविषयी चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत.

आता पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयातने ‘सूर्यवंशी’वर शाब्दिक हल्ला केला आहे. हा चित्रपट इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप तिने केला आहे. महविश हयात ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

महविशने बुधवारी ट्विटरवर लिहिले की, अलीकडचा बॉलिवूड चित्रपट ‘सूर्यवंशी’ इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देतो. हॉलीवूडमध्ये गोष्टी बदलत आहेत आणि मला आशा आहे की  सीमे पार असलेले लोकंही याच पालन करतील. जर तुम्हाला ते नीट दाखवता येत नसेल, तर किमान मुस्लिमांचे चित्रण ज्या पद्धतीने केले जाते त्याबद्दल तरी निपक्ष राहा. द्वेष करू नका, समभाव ठेवा!

यापूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये दाऊदचे पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातसोबत रिलेशनशिप असल्याचा दावा करण्यात आला होता. ही बातमी समोर आल्याने डॉन संतापला असून ही माहिती सार्वजनिक कशी झाली याचा तपास करत असल्याचेही बोलले जात होते.

दाऊदपेक्षा 27 वर्षांनी लहान असलेला महविश ही त्याची सध्याची सर्वात मोठी कमजोरी असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मेहविशला ‘तमगा-ए-इम्तियाज’ हा नागरी सन्मान दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित होत असतानाच गेल्या वर्षी याची चर्चा सुरू झाली होती.

एका आयटम साँगमध्ये महविशला पाहून दाऊदला भुरळ पडली होती आणि यानंतर त्याने महविशला अनेक मोठे प्रोजेक्ट्स मिळवून देण्यासाठी मदत केल्याचे बोलले जाते. मेहविशची ओळख लोड वेडिंग, पंजाब नही जाउंगी आणि अॅक्टर-इन-लॉ या चित्रपटांमुळे झाली.

असे सांगण्यात येत होते की, मेहविशला कराचीतील प्रभावशाली व्यक्तीकडून मदत केली जात आहे, ज्यांचे तहरीक-ए-इन्साफ पक्षाशी चांगले संबंध आहेत. नंतर तो माणूस दाऊद असल्याचा दावा करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या
…तर भारत देश जिहादी बनेल; कंगना पुन्हा बरळली
नमाज पढण्यासाठी हिंदू व्यक्तीने दिले दुकान; म्हणाला जागा कमी पडत असेल तर घर, अंगनही देईल
धक्कादायक! महिला आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर उडाली खळबळ
रामसेतूच्या शूटिंगदरम्यान अक्षयला येतीय आईची आठवण; व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.