जॅकीची दहशत इतकी होती की साक्षात दाऊद पण म्हणाला होता की जॅकीशी पंगा नको रे बाबा

सर्वांना माहितीच आहे की काही वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये अंडरवर्ल्डचे राज्य होते. अनेक चित्रपटांसाठी अंडरवर्ल्डची मदत घेतली गेली होती. पण बॉलीवूडच्या काही कलाकारांसमोर अंडरवर्ल्डचे डॉनही हार मानतात.

असेच एक अभिनेते म्हणजे जॅकी श्रॉफ. जॅकी श्रॉफला बॉलीवूडमध्ये जगू दादा म्हणून ओळखले जाते. चित्रपटांमध्ये येण्या अगोदर जॅकी श्रॉफ खुप गरीब होते. ते मुंबईच्या चाळीत राहत होते. तिथे ते अनेक भांडणे करायचे. त्यामूळे त्यांना जगू भाई म्हणून ओळख होती.

बॉलीवूडमध्ये आल्यानंतर खुप कमी वेळात त्यांनी यश मिळवले. त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. जॅकी श्रॉफ दिव्या भारतीसोबत एका चित्रपटात काम करत होते. चित्रपटाची सगळी तयारी झाली होती.

जॅकी श्रॉफ आणि दिव्या भारतीने चित्रपटाची शुटिंग सुरू केली होती. काही दिवस शुटिंग केल्यानंतर जॅकीने शुटिंगमधून ब्रेक घेतला आणि दुसऱ्या चित्रपटांची शुटिंग सुरू केली. या वेळेत निर्मात्यांनी चित्रपटाची सगळी शुटिंग पुर्ण केली. फक्त जॅकी श्रॉफचे महत्त्वाचे भाग शुट करायचे राहिले होते.

जॅकी श्रॉफ त्यासाठी वेळ देत नव्हते. निर्मात्यांनी अनेक वेळा त्यांना फोन करून शुटिंग पुर्ण करायला सांगितले. पण ते खुप व्यस्त होते. त्यांना अनेक चित्रपटांच्या शुटिंग पुर्ण करायच्या होत्या. त्यामूळे त्यांनी या चित्रपटाकडे दुर्लक्ष केले.

शेवटी चित्रपटाच्या निर्मात्यांनी यावर उपाय शोधला. त्यांना काहीही करून लवकर चित्रपट पुर्ण करायचा होता. म्हणून त्यांनी अंडरवर्ल्डची मदत घेण्याचा निर्णय घेतला. कारण त्यावेळी सगळे बॉलीवूड अंडरवर्ल्डला घाबरत होते.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी डॉन दाऊद इब्राहिमला फोन केला. त्यांनी डॉनला सांगितले की, ‘आम्हाला आमचा चित्रपट लवकर पुर्ण करायचा आहे. पण आमच्या चित्रपटाचा हिरो शुटिंग पुर्ण करत नाही. तो खुप टाईम लावत आहे. म्हणून तुम्ही त्याला एक फोन करा आणि चित्रपट पुर्ण करायला सांगा’.

हे ऐकल्यानंतर दाऊद इब्राहिमने निर्मात्यांना हिरोने नाव विचारले. त्यावेळी निर्मात्यांनी सांगितले की, ‘त्या हिरोचे नाव आहे जॅकी श्रॉफ. तुम्ही त्यांच्याशी बोला आणि आमची समस्या दूर करा’. जॅकी श्रॉफचे नाव ऐकल्यानंतर दाऊद थोडा वेळ काहीही बोलला नाही.

थोड्या वेळाने दाऊद इब्राहिम म्हणाला की, ‘दुसरा कोणता हिरो असता तर मी नक्कीच तुमची समस्या दुर केली असती. पण जगू दादाला मी खुप वर्षांपासून ओळखतो. तो मला माझ्या मोठ्या भावासारखा आहे. मी त्याला काहीही बोलणार नाही. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही नीट शुटिंग करा’.

हे ऐकल्यानंतर निर्मात्यांना धक्काच बसला. ते तक्रार हिरोची करत होते. पण धमकी त्यांनाच मिळाली. दाऊद पुढे म्हणाला की, ‘दादाला मी चांगलच ओळखतो. तुम्ही काळजी करू नका. जगू दादा तुमचे नुकसान होऊ देणार नाही. तुम्ही चित्रपटाची काळजी करू नका’.

बॉलीवूडचे मोठे मोठे कलाकार दाऊद इब्राहिमला घाबरतात. पण जॅकी श्रॉफच्या बाबतीत सगळे काही उलटे झाले. त्यामूळे निर्मात्यांनी या चित्रपटाची काळजी करणे सोडून दिले. त्यांनी सगळे काही जॅकी श्रॉफवर सोडून दिले. त्यांना हवं तेव्हा ते शुट पुर्ण करतील.

कारण त्यांना काहीही अडचण नको होती. त्यांनी परत घाई केली असती तर त्यांचे नुकसान नक्की झाले असते. म्हणून त्यांनी वाट पाहिली. काही दिवसांनी जॅकी श्रॉफने शुटिंग पुर्ण केली.

ही गोष्ट ज्यावेळी जगू दादाला समजली त्यावेळी त्यांना खुप हसायला आले. ते म्हणाले की, ‘मोठे मोठे लोक डॉनला घाबरतात. पण इथे तर डॉनच मला घाबरतो. ही गोष्ट मजेशीर आहे. माझ्या मेहनतीमूळे मला हे यश मिळाले आहे’.

हे ही वाचा –

अखेर कपिलने मुकेश खन्ना यांना दिले प्रत्युत्तर; म्हणाला मी आणि माझी टीम…

नशेत धुंद, डोळे लाल आणि चालता येत नव्हते अशा अवस्थेत अभिनेत्रीच्या रूममध्ये गेला होता संजू बाबा

..म्हणून सनी देओलने ‘डर’ चित्रपटाच्या सेटवर सामान उचलून फेकले होते

बाॅलीवूडचा सर्वात यशस्वी खलनायक महेश आनंदचा मृतदेह दोन दिवस सडत पडला होता..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.