डेव्हिड वॉर्नरचा कुटुंबासोबत भन्नाट डान्स, व्हिडिओ पासून व्हाल त्याचे फॅन, पाहा व्हिडिओ

मुंबई । कोरोना महामारीमुळे देशात थैमान घातल्याने सर्वजण घरी आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवत आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ तसेच फोटो व्हायरल होत आहेत. अनेक क्रिकेटर व कलाकारही आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवत असल्याचे आपण पाहतो. मात्र आता नुकताच एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ आहे ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर व त्याच्या फॅमिलीचा. डेव्हिड वॉर्नरने नुकताच एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात तो पंजाबी गाण्यावर आपल्या पत्नी व मुलांसोबत भन्नाट डान्स करत आहे.

या व्हिडिओत डेव्हिड वॉर्नर पत्नी कँडिस वॉर्नर आणि मुली देखील तितक्यात उत्साहाने या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. सौदा खरा खरा या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.

आपण या व्हिडिओत पाहू शकता, सौदा खरा खरा या गाण्यावर डेव्हिड वॉर्नर पत्नी कँडिस वॉर्नर आणि मुली यांनी ताल धरला आहे. या व्हिडिओला लॉकडाऊनमधील थ्रोबॅक असे कॅप्शन देऊन वॉर्नरने हा व्हिडीओ शेअर केला.

हा व्हिडिओ टिकटॉकवर बनवण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण डेव्हिड वॉर्नरच्या फॅमिलीचे फॅन झाले आहेत. चाहत्यांकडून व्हिडिओवर कमेंट्स व लाईक्सचा वर्षाव होत आहे.

महत्वाच्या बातम्या
त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा आहे, एकदम 70mm.. केदार शिंदेंची खास पोस्ट व्हायरल
अमिताभ बच्चनने दुसऱ्यांदा राजकारणात यायला दिला नकार; चिडलेल्या राजीव गांधीने राजेश खन्नाला बनवले स्टार
मोठी ऑफर! १४ हजारांचा 5G स्मार्टफोन मिळतोय ६९९ रुपयांना, जाणून घ्या…
दुर्दैवी! फुगे विकून घरी परतणाऱ्या बापलेकीवर काळाचा घाला; वाहनाच्या धडकेत मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.