खरच शोभलीस छत्रपतींची लेक; राणूआक्काने बाकीच्यांसारखी बडबड न करता केले ‘हे’ काम; वाचून अभिमान वाटेल

कोरोनाच्या महामारीतून सावरण्यासाठी अनेक मराठी सृष्टीतील कलाकार पुढे येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. फुल नाही पण फुलाची पाकळी असे उद्दिष्टे सर्वानीच डोळ्यासमोर ठेवले तर या अटीतटीच्या काळात गरीब जनता सुखी होऊ शकते. कलाकारच नाही तर अनेक लोक सामाजिक संस्थांमार्फत महामारीला सामोरे जात असताना उपाययोजना आणि मदत जाहीर केलेल्या पाहायला मिळतात.

आणखी एका मराठी अभिनेत्रीने केल अभिमानास्पद काम. सामाजिक भान जपणारी ही अभिनेत्री म्हणजे ‘अश्विनी प्रदीपकुमार महांगडे’. हिला आपण सगळे ओळखतोच. ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज या मालिकेत शिवाजी महाराज यांची कन्या राणुआक्का बनून प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेपूर्वी झी मराठीच्या ‘अस्मिता’ या मालिकेतून मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकले.

आश्विनी सध्या स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची भूमिका सकारात आहे. या मालिकेत देखील तीची भूमिका असाह्य महिलांची मदत करताना दाखवली आहे. आश्विनी महांगडे यांनी दोन वर्षापूर्वी ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ ची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानच्या मार्फत तिने आजवर अनेक गरजूंची सेवा केली.

‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ या संस्थेच्या अंतर्गत तिने अनेक रुग्ण आणि त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य जेवणाची सोय करत आहे. मदतीची सुरुवाती तिने ‘महावारी’ या वेबसिरीजच्या माध्यमातून केली. या वेबसिरीज द्वारे तिने  महिलांच्या समस्यांबाबत जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. पुरंदर येथील रयत बुक बँक असो वा रक्तदान शिबिर अशा सामाजिक कार्यात ती नेहमीच हिरीरीने सहभागी होते.

तिच्या कार्याचे कौतुक म्हणजे तिने फक्त एकाच ठिकाणी नाही तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मोफत जेवणाचा उपक्रम राबवला आहे. सातारा, फलटण, शिरवळ, खंडाळा, सासवड, बारामती, टिटवाळा शहर, ठाणे शहर, कल्याण शहर, अष्टा शहर, हिंडलगा बेळगाव, इस्लामपूर, नेरुळ, अंधेरी, घाटकोपर अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांनी ही मोफत जेवणाची योजना आखल्याचे सांगितले आहे. रुग्णांची आणि पर्यायाने त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांची जेवणाशिवाय हेळसांड होऊ नये हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कोरोनासारख्या महासंकटावर मात करत असताना अनेक जीवनावश्यक गोष्टींची टंचाई भासू लागली आहे. या कठीण काळात लोकांना आपली गरज आहे ही गोष्ट सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे, याचेच जिवंत उदाहरण म्हणजे ‘आश्विनी महांगडे’. तिच्या कार्याची अधिक माहिती तिच्या सोशल मिडीयावर जाऊन पाहता येईल.

हे ही वाचा-

कोरोना रुग्णांवर संत्र्याच्या बागेत उपचार; झाडाच्या फांद्यांना अडकवून देतोय सलाईन

जागतिक आरोग्य संघटनेची दिलासादायक माहिती, कोरोना महामारी संपण्याचे दिले संकेत

वजन कमी करण्यासाठी अभिनेत्रीने केली शस्त्रक्रिया; गमवावा लागला जीव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.