रियल सिंघमने उडवली दौंडमधील काळे धंदेवाल्यांची झोप! सर्व धंदे बंद करत केला साडेचार कोटींचा माल जप्त

बऱ्याचवेळा शहरात अवैध व्यवसाय चालू असतात. तो व्यवयास बंद करणे, आरोपींच्या मुसक्या आवळणे महिनोमहिने पोलिसांना शक्य होत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका खऱ्या आयुष्यातील सिंघमबद्दल सांगणार आहोत, ज्याने फक्त २ महिन्यात दौंडमधले अनेक अवैध व्यवसाय बंद केले आहे.

काही महिन्यांपासून दौंड शहरात अवैध व्यवसायांचे काम खुप वाढत चालले होते. दौंडच्या पुर्वभागातील बेकायदा वाळू उपसा, मटका, जुगारी, गावठी दारुसारख्या अवैध व्यवसायांचे प्रमाण वाढत होते. मात्र या आता दौंड पोलिस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलिस उअपधिक्षक मयुर भुजबळ यांनी अनेकांच्या मुसक्या आवळल्या आहे.

भीमा नदीच्या पात्रातील बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर १५ गुन्हे दाखल करुन ४० वाळू माफियांवर कारवाई करुन तब्बल ४ कोटी ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल मयुर भुडबळ यांनी जप्त केला आहे. या धडाकेबाज कामगिरी त्यांनी फक्त दोन महिन्याच्या परिविक्षाधीन कालावधीत पुर्ण केला आहे.

त्यांच्या या कामगिरीमुळे मयुर भुजबळ यांना दौंडचा सिंघम म्हणून ओळखले जात आहे. अनेक गुन्हेगारांनी आता धसका घेतला आहे. मंगळवारी त्यांचा दोन महिन्याचा कालावधी पुर्ण झाला आहे. अवघ्या दोन महिन्याच्या परिविक्षाधीन कालावधीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे.

२८ मार्च रोजी मयुर भुजबळ हे पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ते दौंड पोलिस ठाण्यात रुजू झाले होते. त्याने लगेच पहिले लक्ष्य बेकायदा व्यवसाय आणि धंदे करणाऱ्या व्यवसायिकांना केले.

त्यासाठी भुजबळ यांनी पोलिस कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करुन हद्दीतील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु केले. वाळू उपसा करणाऱ्यांवर गुन्हा तर त्यांनी दाखल केलाच, त्यासोबत ४० मोठ्या लोकांच्या विरोधात त्यांनी मोठी कारवाई केली.

तसेच यामध्ये २६ अवैध वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक फायबर बोटी आणि ८ वाहने जप्त करुन तब्बल ४ कोटी ३९ लाख रुपये किंमतीचा माल त्यांनी जप्त केला आहे. तसेच या ८ बोटी त्यांनी फोडून नष्ट केल्या आहे.

तसेच भुजबळ यांच्या पथकाने अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर तब्बल ७ लाख ३० हजार रुपयांचा गुटखा आणि विदेशी सिगरेट जप्त केल्या आहे. सोबत त्यांनी शहरातील जुगार अड्ड्यांवर छापा सुद्धा घालून ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करुन कडक कारवाई केली आहे. पत्ताचे क्लब, ऑनलाईन बिंगो मटका, अशा अडड्यांवर छापा टाकत दिड लाखांचा माल जप्त केला आहे.

भुजबळ यांनी देशी विदेशी आणि हातभट्टी दारु विकणाऱ्यांवर कारवाई करत ११ अड्ड्यांवर छाफा टाकला आहे. ११ व्यक्तींवर गुन्हा दाखल करत त्यांनी २ लाख ८५ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. अशा ३१ मोठ्या कारवाई करुन त्यांनी तब्बल ४ कोटी ५१ लाखांचा माल जप्त केला आहे.

सध्या कोरोनाच्या भयंकर स्थितीत कोरोनाला आळा घालण्याचे काम पण त्यांनी केले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली आहे. विनामास्क फिरणाऱ्या १५३६ लोकांवर कारवाई करुन त्यांनी ३ लाख २९ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

तसेच कोरोनाच्या काळात जेष्ठ नागरीकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून त्यांनी एक उपक्रमही सुरु केला आहे. त्यांनी दौंड शहरातील निराधार आणि जेष्ठ नागरीकांच्या घरी जाऊन त्यांनी विचारपुस केली होती, तसेच त्यांना अन्नधान्याचे किट आणि सॅनिटायझर, मास्क वाटप केले होते. त्यांच्या कामाचे पुर्ण राज्यभरातून केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: मासे पकडायला गेलेल्या तरुणाच्या मागे लागली मगर, मग पहा पुढे काय झालं…
त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खूपसला; श्रेयस तळपदेचा बाॅलीवूडबाबत धक्कादायक गौप्यस्फोट
नियम पायदळी तुडवून हळदीचा कार्यक्रम होता सुरू; कार्यक्रमात वाद झाला अन् पाहूण्यांना धू धू धुतलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.