अखेर पाकिस्तानने मान्य केलं; गँगस्टर दाऊद इब्राहिम पाकिस्तामध्येच राहतो

इस्लामाबाद | भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम हा कराचीत राहत असल्याचे अखेर पाकिस्तानने मान्य केलं आहे. पाकिस्तानने 88 दहशतवादी आणि संघटनांची यादी जाहीर केली. त्या यादीत दाऊदचं नाव असून त्याचा पत्ता हा कराची व्हाईट हाऊस असा लिहिला असल्याची माहिती मिळत आहे.

त्यामुळे भारताच्या दाव्याला आता खात्री झाली आहे. UNने आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांची यादी प्रसिद्धी केल्यानंतर पाकिस्तानने आर्थिक प्रतिबंधांपासून वाचण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर पाकिस्तान या सर्व दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांवर कडक आर्थिक प्रतिबंध लादणार आहे. दाऊद इब्राहीमसोबतच हाफिज सईद आणि मसूद अजहर यांचाही यात समावेश आहे.

दहशतवादांना मदत करणाऱ्या देशांवर FATF ही आंतरराष्ट्रीय संघटना लक्ष ठेवत असते. त्या संघटनेने पाकिस्तानला ग्रे यादीत टाकलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पत खालावली होती.

जागतिक वित्तीय संस्था मदतही करत नव्हत्या. त्यामुळे त्या यादीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला ही कृती करावी लागली. या आधी भारताने अनेकदा पुरावे देऊन दाऊद हा पाकिस्तानमध्ये राहत असल्याचे सांगितले होते. मात्र पाकिस्तानने त्याला कायम नकार दिला.

पाकिस्तान सरकारने घोषित केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीतच दाऊदचं नाव असल्याने भारताच्या दाव्याला बळ मिळाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.