खळबळजनक! “अर्णब गोस्वामींनी मला टीआरपीसाठी ४० लाख दिले”; बार्कच्या माजी प्रमुखाचा दावा

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना यासंबंधी लिखित जबाब दिला आहे. ज्यात रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आता गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांनी असा दावा केला आहे की, “रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांनी त्यांना दोन वेगवेगळ्या हॉलीडेसाठी एकूण १२ हजार अमेरिकी डॉलर दिले आहेत. शिवाय तीन वर्षाच्या काळात अर्णब यांनी रिपब्लिक चॅनेलला लाभ मिळवून देत TRP रेटिंग हाताळण्यासाठी आतापर्यंत ४० लाख रुपये दिले आहेत.”

“मी माझ्या टीमसोबत मिळून रिपब्लिक टीव्हीला एक क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न केले. हे २०१७ ते २०१९ पर्यंत सुरु होते. अर्णबने मला या काळात फ्रान्स आणि स्वित्झलंडच्या सहलीसाठी ६००० डॉलर दिले.” असेही दासगुप्ता म्हणाले.

“त्यानंतर स्वीडन आणि डेन्मार्कच्या सहलीसाठी ६००० डॉलर दिले. अशाचप्रकारे अर्णबने मला आयटीसी परेल हॉटेलमध्ये २० लाख आणि नंतर १० लाख रोख दिले,” असे दासगुप्ता म्हणाले आहेत. बार्कची फॉरेंसिक ऑडिट रिपोर्ट, पार्थो दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सऍपचॅटमुळे वातावरण तापले होते.

वरुण धवनची बायको आहे यशस्वी बिजनेस वूमन; जाणून घ्या नताशा दलालबद्दल काही रोचक गोष्टी

“पुरंदरचे विमानतळ बारामतीला हलवण्याचा पवारांचा डाव”; शिवसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप

इशा केसकरच्या बिकनीतील फोटोंनी सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.