डेल्टा + चा धोका! राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू होणार

मुंबई। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून लागू असलेले कठोर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय २० दिवसांपूर्वी घेण्यात आला होता.

मात्र डेल्टा प्लस विषाणूचा धोका व काही जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झालेली वाढ आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यांमुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आल्याचे समजत आहे.

या व्हेरिएंटचे देशभरात 40 रुग्ण आढळून आलेत. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत म्हणजेच महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे राज्य सरकारनं जारी केलेली अनलॉकची पाच टप्प्यातील पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. तसंच दुकानांच्या वेळा पुन्हा एकदा कमी करण्यात येतील, असेही संकेत देण्यात आलेत.

डेल्टा प्लस व्हेरियंट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ शकतो, हा धोका ओळखून राज्य सरकार निर्बंध कडक करण्याच्या तयारीत असल्याचं समजतेय.

त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करणं हे आरोग्य प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे. कारण महाराष्ट्रात येत्या तीन- चार आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्याच्या अनलॉक पद्धतीत राज्य सरकारकडून बदल करण्यात येईल. नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांत अधिक कठोरता आणून अत्यावश्यक दुकानं वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्याची शक्यता आहे.

कोरोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटांची व्याप्ती या दोन निकषांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांत विभागणी करण्यात आली होती.

दर आठवड्याला परिस्थितीनुसार हे निर्बंध कमी -अधिक प्रमाणात लागू करण्याचे धोरण राबविण्यात आले होते. गेल्या तीन आठवड्यांपासून या धोरणानुसार महापालिका आणि जिल्हा स्तरानुसार निर्बंध लागू केले जात आहेत. मात्र आता राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारकडून पुन्हा जैसे थे परिस्थिती होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या
काय सांगता! ATM मध्ये १४०० रुपये काढायला गेलेल्या महिलेला लागली कोट्यावधीची लॉट्री, जाणून घ्या….
लग्नानंतर सासरी जाणाऱ्या नवरीला नवरदेवाच्या भावाने रस्त्यातच केली मारहाण; धक्कादायक कारण आले समोर
4 वर्षांच्या मुलीनं मागवलं ‘इतक्या’ हजारांचं ऑनलाईन फूड, बिल बघून बापाने लावला डोक्याला हात
६ लाखात येणार भारतातील सगळ्यात सुरक्षित कार, global NCAP कडून मिळाले आहे ५ स्टार रेटींग

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.