‘माझ्या जीवाला धोका, रुपालीताई मला घेवून चला’; वर्ध्याच्या भाजप खासदाराच्या सुनेची विनवणी

मुंबई। वर्ध्याचे भाजपाचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानं आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. रामदास तडस यांच्या सुनेनं आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. असेच तिने राष्ट्रवादीकडे स्वतःच्या या छळापासून बचाव करण्यासाठी मदत मागितली आहे.

रामदास तडस यांच्या सुनेनं बनवलेला व्हिडिओ राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला आहे. यात संबंधित महिला रुपाली चाकणकर यांच्या मदतीचं आवाहन करत असून आपल्या जीवाला धोका असल्याचं व्हिडिओत म्हटलं आहे.

खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस याच्याविरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार पत्नीने पोलिस महानिरीक्षकांकडे केली होती. या तक्रारीमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली आहे. परंतु आता या प्रकरणाला काहीसे वेगळे वळण लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी पूजाच्या संरक्षणासाठी पोहोचल्या आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी ट्विटद्वारे दिली. ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे पाहुयात.

रुपाली चाकणकर यांनी आपल्या स्वत:च्या अकाऊंटवरुन व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा चाकणकर यांचा आहे. या व्हिडीओतील महिला म्हणते, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते” असं या व्हिडिओतील महिला सांगत आहे.

“वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन गेली अनेक दिवस हे तडस कुटुंब मारहाण करुन अत्याचार करीत आहेत. पुजाचा आताच हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला आहे. तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी पोहोचले आहेत”, असं रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान रामदास तडस यांच्या सुनेने पोलिस महानिरीक्षकांकडे दिलेल्या या तक्रारीत खासदार रामदास तडस, त्यांची पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. व आता या व्हिडिओमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी पूजाच्या संरक्षणासाठी पोहोचल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
अक्षय कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर, रडून रडून झाला बेहाल; केली ‘अशी’ भावनिक पोस्ट 
आज मला असह्य दुख: होतय! आईच्या निधनानंतर अक्षयकुमारने जे लिहीलंय ते वाचून ढसाढसा
रडाल 
आरोग्य केंद्र बंद करून मंदिरं उघडू का? मुख्यमंत्र्यांचा भाजपच्या केंद्रीय मंत्र्यासमोरच सवाल…  
अजितदादांच्या कामांचा जगात डंका! कोरोना काळातील कामांमुळे सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्काराने गौरव

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.