युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्रीचा चाबूक डान्स; एकदा हा भन्नाट व्हिडीओ पाहाच

मुंबई | क्रिकेटर युजवेंद्र चहलची फियॉन्से धनश्री वर्माने आपल्या डान्सने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रांम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका स्टु़डिओमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत ए दिल है मुश्किल या हिंदी चित्रपटातील ‘क्युटी पाय’ गाण्यावर डान्स करत आहे.

तसेच नुकताच तिने वेडिंग स्पेशल डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ युट्यूबवर प्रचंड धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडीओत धनश्री रणबीर कपूरसोबतच्या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तिच्या या व्हिडीओवर क्रिकेटर युजवेंद्र चहलनेदेखील कमेंट केली आहे. त्याने हार्ट शेप इमोजी आणि क्लॅपिंग इमोजी शेअर करून रिअ‍ॅक्शन दिली आहे.

याचबरोबर धनश्रीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओ ती लाल रंगाच्या ड्रेस दिसतं आहे. हा माझा सर्वात आवडता व्हिडीओ असल्याचे तिने कॅप्शनमधून सांगितले आहे. तसेच, दोन सहकाऱ्यांसोबत डान्स करताना खूप आनंद वाटला असल्याचे तिने म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
लसीचे वितरण कसे होईल? लस कुठे साठवणार? याबद्दल पुनावालांनी दिली महत्वाची माहिती
‘महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत’
लढा कोरोनाविरूध्द! ‘या’ शहरात मिळणार मोफत मास्क; घ्या जाणून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.