कोरोनाचे नियम धाब्यावर! मनसे नेत्याने डान्सबारचा व्हिडीओ आणला समोर

मुंबई : राज्यात पुन्हा करोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. अलीकडे रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून नियम पाळण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

तर दुसरीकडे डान्सबारमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेने एका डान्सबारमधील व्हिडीओ समोर आणला आहे. या डान्सबारमध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे. डान्सबारमध्ये सोशल डिस्टंन्ससिंगचा फज्जा उडाला आहे.

मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी मुंबईतील बोरिवली परिसरातील एका डान्सबारचा व्हिडीओ समोर आणला आहे. बारमध्ये ग्राहक, बारबाला आणि वेटर कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क नाही. बारबालांवर पैशांची उधळण सुरू असल्याचेही या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पब्ज आणि बारला मध्यरात्रीनंतर सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपणे पब्ज सुरू असल्याचे समोर आले आहे. अशातच आता बोरिवलीमध्ये डान्सबारचा व्हिडीओ समोर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बाळासाहेब ठाकरेंच्या ४०० कोटींच्या स्मारकाऐवजी रूग्णालय उभारा – इम्तियाज जलील

झाला खुलासा! ‘या’ अभिनेत्रीचं बुमराह-संजनाच्या लग्नावर शिक्कामोर्तब

अभिमानास्पद! दोन्ही पाय अपंग असताना त्याने लिंगाणासारख्या खडतर किल्ल्यावर केली चढाई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.