”ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणाऱ्या दलिताला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही”

नवी दिल्ली | केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणाऱ्या दलितांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राज्यसभेत प्रसाद यांनी जाहीर केले आहे की, जे दलित ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारतील त्यांना कोणत्याही अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.

देशात धर्मांतरण आणि आरक्षण हे मुद्दे कायमच चर्चेचा विषय ठरले आहेत. यावरुन अनेकदा राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले आहे. यासंदर्भातीलच एक महत्त्वपुर्ण घोषणा राज्यासभेत केली गेली आहे. भाजप खासदार जीव्हीएल नरसिंहराव यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद बोलत होते.

रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘’ज्या दलित नागरिकांने ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारला आहे त्याला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. तसेच त्यांना एससी आरक्षित जागेवरुन निवडणूक लढता येणार नाही. याशिवाय त्यांना एससी आरक्षणाचा इतर कोणताही लाभ घेता येणार नाही’’.

प्रसाद बोलताना पुढे म्हणाले की, संविधानाच्या परिच्छेद ३ मध्ये अनुसुचित जातींबाबत म्हटले आहे की हिंदु, शीख किंवा बुद्ध धर्माव्यतिरिक्त कोणत्याही धर्मातील व्यक्तीला अनुसुचित जातीच्या अरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.

याशिवाय काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांच्याकडून मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मातील वंचितांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल असे विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना प्रसाद यांनी कायद्यात कोणतीही अस्पष्ट तरतुद नाही. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की केवळ हिंदु, शीख किंवा बुद्ध धर्मातील नागरिकांनाच या आरक्षणाचा लाभ घेता येईल.

महत्त्वाच्या बातम्या-
कृषी विधेयकांवरुन राज्यसभेत झालेल्या गोंधळावर शरद पवार, म्हणाले…
नाथाभाऊ गरजले; ‘ईडी लावली तर, सीडी लावेन असं गमतीनं म्हटलेलं, पण…’
केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेत शेतकऱ्यांना मिळणार ३६,००० रुपये पेन्शन, असा करा अर्ज..
बाबो! मानसी नाईकने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; सोशल मिडीयावर घालतोय तुफान धुमाकूळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.