दलिताने झाड तोडण्यास नकार दिला म्हणून त्याच्या कुटुंबाचे अपहरण, गरोदर पत्नीवर बलात्कार

एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यानंतर माणुसकीवरून अनेक लोकांचा विश्वास उडाला आहे. दलित मजुराला शेतावर कामाला बोलावल्यानंतर त्याने झाड तोडण्यास नकार दिल्याने त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

पण गुंड एवढ्यावरच थांबले नाहीत. जेव्हा मारहाण केल्यानंतर तो आपल्या घरी परतला तेव्हा त्याचा पाठलाग करून गुंडांनी त्याची गरोदर पत्नी, दोन मुले आणि आईलाही मारहाण केली. यानंतर त्यांचे अपहरण करून चार दिवस त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले.

या नराधमांनी त्याच्या गरोदर पत्नीवर मुलाबाळांसमोर आणि त्याच्यासमोरच तिच्यावर बलात्कार केला. मध्यप्रदेशमधील छतरपूर येथे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.

मुख्य आरोपी गावातीलच असून त्याला गुरूवारी अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यासोबतचे दोन साथिदार फरार झाल्याचे माहिती त्यांनी दिली आहे. गुरूवारी मजूराच्या पत्नीने मिडीयासमोर तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती सांगितली पण पोलिसांना दिलेल्या तक्ररीमध्ये तिने याबाबत खुलासा केला नव्हता.

जर तिने ही माहिती लेखी दिली तर आरोपींवर बलात्काराच्या गुन्हाअरंतर्गत कलम लावण्यात येतील असं पोलिस विभागातर्फे सांगण्यात आले आहे. या महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहे. याबाबत तिने तिच्या तक्रारीत उल्लेख केलेला आहे.

पण तिने लैगिंक अत्याचाराबाबत कसलाही उल्लेख केलेला नाही. राजनगर ठाणे प्रभारी पंकज शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. घटनेतील दलित मजूराच्या कुटुबीयांना चार दिवस डांबून ठेवल्याची बाब पत्रकारांनी पोलिसांपर्यंत पोहोचवल्यानंतर या सर्वांची सुटका करण्यात आली होती.

कामावर आलेल्या ३२ वर्षीय मजूराने तब्येतीचे कारण सांगून आरोपीच्या शेतातील झाड तोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला आहे. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि त्याचे साथीदार फरार आहेत.

महत्वाच्या बातम्या
पत्नीने पतीला रंगे हात पकडले, दुसऱ्या महिलेसोबत एका रूममध्ये होता बंद, मग..
सुशांतच्या पुण्यतिथी आधी या अभिनेत्याने केले त्याच्या चाहत्यांचे कौतुक, म्हणाला सुशांतने हे कमवलं होतं
महेंद्रसिंग धोनी आता झाला पुणेकर, पुण्यात घेतले घर, पाहा फोटो
भाजप कार्यकर्त्याला केलेली मारहाण पोलिसांना भोवली, जालण्यात PSI सह ५ पोलिसांचे निलंबन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.