क्रुरतेचा कळस! हातपाय बांधून दलित तरूणाला पोलिसाकडून मारहाण, पाणी मागितले तर पाजले मुत्र

एक अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एका दलित तरूणाने पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, पोलिस उपनिरिक्षकाने आधी त्याला पोलिस स्टेशनमध्ये नेऊन जबर मारहाण केली.

तर चौकशीदरम्यान त्याला मुत्र पाजण्यात आले. तरूणाने ही तक्रार राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे. हे प्रकरण कर्नाटकचे आहे. चिकमंगलूरमधील गोनीबीडू पोलिस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या व्यक्तीचे नाव पुनित आहे.

त्याने गोनीबीडू पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील पोलिस उपनिरीक्षकावर असा आरोप केला होता की, पोलिसाने चौकशीदरम्यान त्याला मुत्र पाजले. पुनीतने पोलिस महासंचालक प्रवीण सुद यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. त्यानं त्याच्यासोबत झालेल्या या अमानवी कृत्यासाठी न्याय मागितला आहे.

तसेच त्या पोलिसाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही त्याने केली आहे. त्याचे म्हणणे आहे की गावातील काही लोकांनी त्याची तोंडी तक्रार पोलिसांकडे केली होती. त्याच्यावरच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर असा आरोप होता की तो एका गावातील महिलेसोबत बोलत होता.

त्यामुळे गावातील लोक त्याच्यावर नाराज होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आणि ठाण्यात नेलं. तेथे गेल्यावर त्याचे हातपाय बांधून मारहाण करण्यात आली. जेव्हा त्याला तहाण लागली तेव्हा त्याने पाणी मागितले.

त्याला इतकी तहाण लागली होती की पाणी न मिळाल्याने त्याचा जीवही गेला असता, असे त्याला वाटत होते. पण पोलिसांनी चेतन नावाच्या एका दुसऱ्या व्यक्तीला त्याच्यावर लघुशंका करण्यास सांगितले. पुनीत पुढे म्हणाला की, मला ठाण्यातून सोडण्यासाठी त्यांनी मला फरशीवरील मुत्र चाटण्यास सांगितले.

काहीही पर्याय नसल्याने मी ते केलं आणि मी बाहेर आलो. पोलिसांनी मला मारहाण केली आणि दलित समाजाला शिवीगाळही केली, असेही तो म्हणाला आहे. दरम्यान, संबंधित पोलिस उपनिरीक्षकावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या
देवमाणूस! बाळ सारखं रडत होतं, बाळाला शांत करण्यासाठी डॉक्टरने गायलं गाणं; पाहा व्हिडिओ
१५ दिवसाला नवं लग्न, सोनूची १३ लग्न अन् १३ मुलांना लुटलं; अखेर लुटेरी सोनू शिंदे सापडलीच
गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये सापडले घबाड; मशीन आणल्या तरी रात्रभर नोटा मोजून होईना
खलनायक रणजितच्या प्रेमात पागल झाली होती अभिनेत्री सिंपल कपाडिया; राजेश खन्नामूळे केले ब्रेकअप

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.