Homeताज्या बातम्यासलमानच्या 'या' हिट चित्रपटाचा येणार सिक्वल, सलमानसोबत पुन्हा एकदा दिसणार डेझी शाह

सलमानच्या ‘या’ हिट चित्रपटाचा येणार सिक्वल, सलमानसोबत पुन्हा एकदा दिसणार डेझी शाह

सलमान खानने त्याच्या वाढदिवशी अनीस बज्मीसोबत ‘नो एन्ट्री’ या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. सलमानने सांगितले की, तो लवकरच या कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ‘नो एंट्री’चा सिक्वेल असलेल्या ‘नो एंट्री में एंट्री’मध्ये सलमान तिहेरी भूमिकेत दिसणार आहे. सलमानशिवाय अनिल कपूर आणि फरदीन खान हे देखील तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत.

निर्मात्यांनी या सर्व 9 पात्रांसाठी 9 वेगवेगळ्या अभिनेत्रींना कास्ट करण्याची योजना सुरू केली आहे, त्यापैकी चार अभिनेत्रींची निश्चिती झाली आहे. सलमान खानचा हिट कॉमेडी चित्रपट ‘नो एंट्री’च्या सिक्वेलची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. कधी या चित्रपटाच्या निर्मितीच्या बातम्या येतात तर कधी हा चित्रपट कोल्ड स्टोरेजमध्ये जातो.

आता पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निर्मितीच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. या चित्रपटाच्या पुढील भागासाठी निर्मात्यांनी विशेष तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. या चित्रपटात डेझी शाह पुन्हा एकदा सलमान खानसोबत दिसणार आहे. डेजी शाह सलमानच्या 2014 मध्ये आलेल्या ‘जय हो’ आणि 2018 मध्ये आलेल्या ‘रेस 3’मध्ये दिसली होती. या दोघांच्या जोडीलाही चाहत्यांनी पसंती दाखवली होती.

एका सूत्राने सांगितले की, “नो एंट्रीच्या सिक्वेलचे प्लॅनिंग गेल्या 6 वर्षांपासून सुरू होते आणि आता त्याची स्क्रिप्ट अखेर फायनल झाली आहे. निर्मात्यांनी मुख्य कलाकार म्हणून फरदीन खान, अनिल कपूर, सलमान खान आणि या चित्रपटातील जुनी स्टारकास्ट ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीबद्दल बोलायचे झाले तर, 9 वेगवेगळ्या अभिनेत्री या चित्रपटात दिसणार आहेत. या 9 अभिनेत्रींमध्ये डेझी शाह व्यतिरिक्त बिपाशा बसू, सेलिना जेटली आणि लारा दत्ता यांच्या नावाची पुष्टी झाली आहे.

सलमानच्या अपोजिट डेझी दिसणार आहे. या चित्रपटात तिचा कॅमिओ रोल आणि डान्स नंबर असणार आहे. कथेची कॅचलाईन सारखीच असेल ती म्हणजे तीन नवरे दिशाभूल करू पाहत आहेत आणि त्यातून झालेला वेडेपणा. पुन्हा एकदा त्यांची पागलपंती पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असेलेले पाहायला मिळतात.

तुम्हाला सांगू इच्छितो की, मुकेश छाबरा या चित्रपटाच्या कास्टिंगची जबाबदारी निभावत आहेत. चित्रपटांतील उर्वरित अभिनेत्रींची निवड ते करणार आहे. 2005 साली ‘नो एंट्री’ हा पती-पत्नीच्या नात्यावर आधारित चित्रपट होता, ज्यामध्ये पती पत्नीशी बेवफाई करतात आणि बाहेर मुलींसोबत मजा करतात.

या चित्रपटाची कथाही तीच असेल पण यावेळी हे स्टार्स तीन वेगवेगळ्या भूमिका करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले असून ते या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहेत. या चित्रपटाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
“१२ कोटींची मर्सिडीज बेन्झ घेणाऱ्या पंतप्रधानांनी आतातरी स्वत:ला फकीर म्हणून घेऊ नये”
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यात ८० लाख रुग्ण, ८० हजार मृत्यु?; आरोग्य सचिवांच्या पत्राने उडाली खळबळ
नवीन वर्षात महागाई वाढणार, पैसै काढण्यापासून ते चप्पल खरेदीपर्यंत, ‘या’ गोष्टींच्या किंमती वाढणार