दररोज गांजाचे सेवन, फ्लॅटमध्ये भुताचा भास; सुशांतच्या कुकने केले धक्कादायक खुलासे

मुंबई | १४ जूनला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतचे मृतदेह वांद्रेच्या त्याच्या राहत्या घरात आढळून आले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता ही आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.

पोलिसांच्या तपासानंतर आता हे प्रकरण सीबीआयला सोपविण्यात आले आहे. सीबीआयने या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली असून या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहे.

सीबीआयने सर्वात आधी सुशांतचा कुक नीरज सिंगची चौकशी केली आहे. सीबीआयने निरजची आतापर्यंत तीन वेळा चौकशी केली असून नीरजने या चौकशीत अनेक खुलासे केले आहे.

सुशांत सरांनी मृत्यूच्या तीन दिवस आधी गांजाचे सेवन केले होते. पार्टीमध्येही सुशांत सर गांजाचे सेवन करायचे, असा धक्कादायक खुलासा नीरजने केला आहे.

तसेच सुशांत सरांच्या आत्महत्येआधी तीन दिवस पुरेल एवढ्या सिगारेट मी त्यांच्या बॉक्समध्ये ठेवल्या होत्या. सुशांत सरांच्या आत्महत्येनंतर तो बॉक्स पाहिला तर तो बॉक्स पूर्ण रिकामा होता, असेही नीरजने सीबीआयला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

तसेच सुशांत सर डिसेंबर २०१९ मध्ये माउंट ब्लॉक अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले होते. मात्र वांद्र्यातच राहत असलेल्या कॅप्री हाइट्समध्ये आम्हाला वॉकी टॉकीचे सेट्स दिलेले होते. त्यावरून सुशांत सर आम्हाला काम सांगायचे.

एका रात्री मला वॉकी टॉकीवरून आवाज आला की, ‘नीरज लाईट बंद करा दो’ पण मी बेडरूमजवळ गेलो तर सुशांत सर झोपलेले होते आणि लाईट देखील बंद होती.

पुन्हा काही वेळाने तसाच आवाज मला आला मी पुन्हा पाहून आलो तर लाईट बंदच होत्या आणि सुशांत सरही झोपलेले होते, त्यामुळे मी खूप घाबरून गेलो होतो इतकेच नाही लिफ्टचा खालीवर जाण्याचा आवाजही येत होता, त्यामुळे सुशांत सरांनी ते घर सोडले होते, असेही नीरजने म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.