बाबो! भंगारवाल्याने चक्क खरेदी केले 3 हेलिकॉप्टर, तब्बल एवढी चुकवली किंमत

मुंबई। आपण आतापर्यंत अनेक गरीब लोक अचानक श्रीमंत झाल्याचे ऐकले आहे. तसेच गरिबांच्या घरी पैशाचे ढीग भेटल्याचाही घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र एक धक्कादायक आणि विश्वास बसणार नाही अशी माहिती समोर आली आहे.

एका साध्या भंगारवाल्याने 3 हेलिकॉप्टर खरेदी केले आहेत. हे ऐकून एक क्षण विश्वास बसणार नाही मात्र हे घडलंय. हा संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी लोकांनी गर्दीही केली. पंजाबच्या मानसामधील ही घटना आहे.

पंजाबच्या मिट्ठू कबाडिया नावाच्या भंगारवाल्याकडे हे हेलिकॉप्टर्स पोहोचल्याची माहिती मिळताच लोकांनी पाहण्याची मोठी गर्दी केली. लोकांनी या हेलिकॉप्टर्सचे फोटो देखील काढले आहेत. हा सर्व प्रकार पाहून सर्वजण हैराण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक हेलिकॉप्टरचं वजन १० टन आहे. हे एका लिलावातून खरेदी करण्यात आले. भंगारवाल्याकडून खरेदी करण्यात आलेल्या एकूण ६ कंडम हेलिकॉप्टर्सपैकी एक मुंबईच्या व्यक्तीने खरेदी केलं. दोन हेलिकॉप्टर्स लुधियानाच्या एका हॉटेल मालकाने खरेदी केले. इतर तीन हेलिकॉप्टर घेऊन अरोरा मानसाला पोहोचले.

सद्या हे हेलिकॉप्टर्स लोकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले आहे. पंजाबमध्ये भंगारचे उद्योगपती मिट्ठू राम अरोरा यांनी उत्तर प्रदेशच्या सहारनपूरच्या सरसवा एअरबेसमधून ६ हेलिकॉप्टर खरेदी केले. अरोडा यांनी या ६ हेलिकॉप्टर्ससाठी ७२ लाख रूपये इतकी किंमत चुकवली.

मिट्ठू राम अरोराने सांगितलं की, लिलावानंतर ट्रॉलिंच्या माध्यमातून हे हेलिकॉप्टर मानसा येथे आणले. मिट्ठू रामने सांगितलं की, त्यांनी पहिल्यांदाच हेलिकॉप्टरची खरेदी केली. आता ते बघण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.