बाबो! १ कप चहाची किंमत १००० रुपये, काय आहे चहाची खासियत, जाणून घेऊयात

मुंबई। चहा म्हणजे पृथ्वीवरचं अमृत असं म्हटलं जातं. बहुतांश लोकांची सकाळ ही चहानेच सुरू होते. मात्र अलीकडच्या काळात चहामध्येही अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यात ग्रीन टी, हर्बल टी, ब्लॅक टी असे अनेक प्रकार आले आहेत. मात्र बहुतेक लोकांना आपला साधा घरगुती चहापतीवाला चहा आवडत असतो.

बहुतेक जणांना टपरीवरचा किंवा साधा स्टॉलवरचा चहा खूप आवडत असतो. मात्र त्याची किंमत जास्तीत जास्त १० ते १२ रुपये असते. पण तुम्ही कधी १००० रुपयांचा चहा पिलाय का? नाही ना.

मात्र, चहाप्रेमींसाठी आज आम्ही अशी एक जागा सांगत आहोत जिथे एक कप चहाची किंमत एक हजार रुपये आहे आणि ही जागा भारतातीलच आहे. या तर जाणून घेऊयात या महागड्या चहाबद्दलची खासियत.

ही चहा कोलकाताच्या एका स्टॉलवर मिळते. या दुकानाच्या मालकाचं नाव आहे, पार्थ प्रातिम गांगुली. त्यांनी २०१४ मध्ये हे दुकान सुरू केलं. पार्थ यांनी नोकरी सोडून आवड होती म्हणून चहा विकण्याचं काम सुरू केलं. मात्र हळूहळू पार्थ यांचा चहा जगप्रसिद्ध झाला. कोलकाताच्या मुकुंदपूरमध्ये हे टी स्टॉल आहे.

या छोट्याशा स्टॉलमध्ये ग्राहकांसाठी १०० प्रकारचे वेगवेगळे चहा उपलब्ध आहेत. इथे एक कप चहाची किंमत अगदी बारा रुपयांपासून सुरू होऊन हजार रुपये प्रति कप इतकीही आहे. एक हजार रुपये किंमत असणाऱ्या या एक कप चहाची खासियत नेमकी काय आहे, तर या चहासाठी Bo-Lay नावाची चहापावडर वापरली जाते.

या एक किलो चहापावडरची किंमत ३ लाख रुपये आहे. या दुकानात १०० प्रकारचा चहा मिळतो. लवेंडर टी, ओकेटी टी, वाईन टी, तुलसी जिंजर टी, हिबिस्कस टी, रूबियस टी, सिलव्हर टी आणि ब्लू टिश्यन टी अशी यातील काही खास चहाची नावं आहेत.

मात्र या चहाची खासियत आगळी वेगळी असल्याने अनेक चहा प्रेमी येथे चहा प्यायला येत असतात.

महत्वाच्या बातम्या
तरुणीने चुकून कंडिशनरच्या जागी लिहिले कंडोम, वडिलांनी पाहिला मेसेज आणि…
विजयने केला सुपस्टार रजनीकांतचा रेकॉर्ड ब्रेक? एका चित्रपटासाठी घेतले सर्वाधिक मानधन
‘इंडियन आयडल १२’ चे परीक्षक नेहा कक्कर व हिमेश झाले ट्रोल; लोकं म्हणाली ड्रामा करणं बंद करा..
पुण्यातला तरुण शेवग्याच्या पानांपासून चिक्की, चॉकलेट, विकून कमवतोय लाखो रुपये, जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.