बाबो! गुजरातचं आकाश अचानक उजळल्यानं घबराट,एलियन असल्याचा लोकांचा अंदाज

अहमदाबाद। आपण आतापर्यंत चित्रपटांमध्ये किंवा कार्टूनमध्ये एलियन असल्याचे पाहिले आहे. मात्र प्रत्यक्षात कोणी एलियन पाहिला आहे का ? नाही ना. मात्र गुजरातमध्ये 21 जूनच्या रात्री आकाशात एक वस्तू दिसली, ज्यातून प्रकाशकिरण बाहेर पडत होते. अचानक हा प्रकार पाहून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आकाशात उडणारा आणि प्रकाशकिरणं सोडणारा एक अज्ञात घटक किंवा उडती तबकडी गुजरातच्या आकाशात फिरत असल्याचं काही नागरिकांना दिसलं आणि पाहता पाहता देशभर याची चर्चा रंगली आहे. हे संपूर्ण दृश्य अनेकांच्या मोबाईल कॅमेरात कैद झाली आहेत.

हा व्हिडीओ फेनिश लाडानी या व्यक्तीच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. दिव्येश त्रिवेदी यांनीही एक VIDEO Tweet केला आहे. एक अज्ञात घटक आपल्याला दिसला आणि 30 ते 40 प्रकारचे लाईट्स जमिनीवर पडल्याचं आपण पाहिलं, असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

मात्र अशी कुठलीही अज्ञात वस्तू आकाशात फिरत असल्याची शक्यता गुरातच्या विज्ञान मंडळानं फेटाळून लावली आहे. शास्त्रज्ञांनी आकाशात दिसलेला हा घटक म्हणजे काय असेल, याच्या तीन शक्यता वर्तवल्या आहेत. पहिलं म्हणजे ती उल्का असू शकते.

दुसरं म्हणजे एखादा तुटलेला तारा असू शकतो किंवा एखादा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून पुढे निघून गेलेला असू शकतो. याव्यतिरिक्त इतर कुठलीही शक्यता नसून नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन शास्त्रज्ञांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या
बॅंकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून बॉलीवूडमध्ये नाव करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत होत्या रिमा लागू
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपद काँग्रेसकडे, अध्यक्षपदासाठी या मोठ्या नावाची चर्चा
राज ठाकरे यांच्या वेगळ्या भूमिकेनंतर देखील आमदार राजू पाटील त्या आंदोलनात होणार सहभागी
वयाच्या ७३ व्या वर्षी राखी गुलजार करतात ‘हे’ काम, त्यांना ओळखणेही झाले कठीण….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.