‘रजनीकांत यांना निवडणुकीमुळे पुरस्कार दिलाय का?’; प्रकाश जावडेकर संतापले

मुंबई : जगभरातील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेले सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरूवारी याबाबतची घोषणा केली. ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्काराने 3 मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे.

मात्र, या पुरस्काराचा तामिळनाडू निवडणुकीशी संबंध लावला जात आहे. अशीच शंका पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आली होती. त्यावरून प्रकाश जावडेकर यांना संताप अनावर झाला.

पत्रकार परिषदेदरम्यान, ‘तामिळनाडूमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे रजनीकांत यांना दादासाहेब पुरस्कार दिला जात आहे का?,’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना जावडेकर चांगलेच भडकले.

ते म्हणाले, “हा पुरस्कार सिनेसृष्टीशी संबंधित आहे. पाच जणांच्या निवड समितीने एकमताने रजनीकांत यांच्या नावाची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. यात राजकारण कोठून आलं? प्रश्न नीट विचारले पाहिजेत,” असे जावडेकर यांनी म्हंटले.

दरम्यान, रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरूमधील एका मराठी कुटुंबात झाला. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी परिश्रम व धडपडीमुळे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केलं. दक्षिणेस रजनीकांत यांना थलायवा आणि देव मानलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या 

“बॉलिवूडचे ठेकेदार करण जोहर आणि आदित्या चोप्रा लपून बसलेले असताना मी आलीये बॉलिवूडला वाचवायला”

रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन; राजकीय चर्चांना उधाण

पोलिसांनी लोकांना दिलेली शिक्षा बघून आनंद महिंद्राही घाबरले; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.