‘त्या’ अंघोळ करणाऱ्या बाईवर लिहलेल्या गाण्यामुळे दादांना थेट सेन्सर बोर्डाने बोलावले होते

दादा कोंडके ज्यांनी मराठी प्रेक्षकांना भरभरून हसवले. त्यांच्या अभिनयाने त्यांनी लोकांची मने जिंकली. त्यांची प्रत्येक भुमिका आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहे. त्यांचे चित्रपट आजही लोकांना भरपूर हसवतात.

दादांच्या चित्रपटांची आणखीन एक खासियत म्हणजे त्यांच्या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्स हे द्विअर्थी असायचे. त्यामूळे प्रेक्षकांना कधीकधी त्यांच्या चित्रपटांचा अर्थच कळत नव्हता. आत्ता मराठी भाषाच अशी आहे की, तिला जसं फिरवलं तशी ती फिरते.

मराठी भाषेच्या या विशेषतेचा फायदा दादा कोंडके यांनी मोठ्या प्रमाणावर करुन घेतला होता. त्यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये भाषेच्या द्विअर्थी स्वभावाचा फायदा करुन घेतला होता. म्हणून त्यांचे चित्रपट विनोदी असायचे. प्रेक्षकांना त्यांचे असे चित्रपट खुप जास्त आवडायचे

पण त्यांचे चित्रपट सहजासहजी प्रेक्षकांच्या भेटीला येत नव्हते. त्यांना रिजीज होण्याअगोदर सेन्सर बोर्डात अडवायचे. पहील्याच चित्रपटापासून ही परंपरा सुरु झाली होती. त्यांच्या अनेक चित्रपटांना सेन्सर बोर्ड अडवायचे.

दादांनी १९७१ मध्ये ‘सोंगाड्या’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला अभूतपूर्व असे यश मिळाले. या चित्रपटाने लोकप्रियता संपादन केली आणि मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला विनोदाचा बादशाह मिळवून दिला.

त्यांचा पहीलाच चित्रपट सेन्सर बोर्डाच्या कैचित सापडला. या चित्रपटातील गाण्यांवर बोर्डातील लोकांनी आक्षेप घेलता. शांताबाई शेळके आणि वंदना विटणकर अशा कवी बोर्डात होत्या. त्यांनी चित्रपटातील गाण्यांवर आक्षेप घेतला आणि चित्रपटाला थांबवले.

मळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी
राखण करते हो मी रावजी, रावजी,
हात नका लावू पाहील कोणीतरी

या गाण्यातील अनेक ओळींवर सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतला. यातल्या काही ओळी होत्या,
गोऱ्या गालावरी गं माझ्या लाली लागली दिसू,
आंघोळीला बसले, माझं मलाच येई हसू ग

बोर्डातील लोकांचे म्हणणे होते की,’एकटीच बाई आंघोळीला बसल्यावर तिला हसू का येईल? त्यांनी थेट दादा कोंडके यांनाच ऑफिसमध्ये बोलावून घेतले. दादानीं थेट कपाळाला हात लावला. एवढ्या छोट्याश्या कारणावरुन त्यांचा चित्रपट थांबण्यात आला होता.

दादा म्हणाले की,’अहो, आत्ता एखादी बाई अंघोळीला गेल्यावर का हसते हे मला काय माहीत…मी काय आत डोकावून बघावं अशी तुमची अपेक्षा आहे का? दादांच्या या उत्तराने बोर्डातील लोकांना हसू आले. शांताबाई म्हणाल्या, ‘काहीतरीचं दादाच तुमचं, बरं! बरं! पास करा ही ओळ…

या ओळींनंतर लगेच गाण्याच्या दुसऱ्या ओळईवर आक्षेप घेण्यात आला. या ओळी होत्या…
औंदाचं ग वरीस बाई मी सोळावं वरीस गाठलं गं
चोळी दाटली अंगाला बाई काय कुठं वाढलं ग

शांताबाईंनी सांगितले की, ‘दादा या ओळी चालणार नाहीत’. मग शेवटी या ओळींमध्ये बदल करण्यात आला. त्याजागी “चोळी दाटली अंगाला बाई काय कुठं वाढलं गं कापड का फाटलं गं” या ओळी घेण्यात आल्या.

एवढे बदल केल्यानंतर चित्रपट रिलीज झाला. चित्रपट आणि चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली. दादा कोंडकेंनी ही आयडीया वापरली नसती तर ढगाला कळ लागली नसती. दादांच्या आयडीयामूळे हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

एकमेकांच्या प्रेमात पडायच्या आधी काजोलचे आणि अजय देवगनचे दुसरीकडेच लफडे सुरू होते

ऐश्वर्या- अभिषेकने लेक आराध्यासोबत देसी गर्ल गाण्यावर केला धमाकेदार डान्स; पहा व्हिडीओ

‘तसले’ सिनेमे करण्यापेक्षा मी एखाद दुकान टाकून सामान विकेल म्हणणाऱ्या हिरोवर काय दिवस आलेत बघा

हमारी अधूरी कहानी! वाचा किंग ऑफ रोमान्स यश चोप्राची अधूरी प्रेम कहानी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.