सलग ९ चित्रपट गोल्डन जुबली; जाणून घ्या दादा कोंडकेंबद्दल माहीती नसलेल्या गोष्टी

मराठी फिल्म इंडस्ट्री आत्ता बॉलीवूडला चांगलीच टक्कर देत आहे. अनेक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर करोडोची कमाई करत आहेत. ही गोष्ट झाली आत्ताची. पण तुम्हाला माहीती आहे का? ७० च्या दशकात एका मराठी अभिनेत्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आले होते.

हे अभिनेते होते दादा कोंडके. दादा कोंडकेला फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळीच ओळख आहे. त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एक वेगळा रेकॉर्ड केला आहे.

म्हणून त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. दादांचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले. दादांचे सलग नऊ चित्रपट बॉक्स ऑफिसवर गोल्डन जुबली ठरले.

आत्तापर्यंत कोणत्याही अभिनेत्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एका पाठोमाग एक हिट झाले नव्हते. ही पहिलीच वेळ होती. या गोष्टीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आणि ह्याची नोंद केली.

गोल्डन जुबली म्हणजे कोणताही सिनेमा सलग २५ आठवडे सिनेमागृहात चालतो. त्यावेळी त्याला गोल्डन जुबली बोलले जाते. दादा कोंडके यांचे सलग ९ चित्रपट गोल्डन जुबली होते. हा रेकॉर्ड खरच खुप अप्रतिम आहे.

आजकाल ही गोष्ट अशक्य आहे. पण त्याकाळी एवढा मोठा रेकॉर्ड होणे ही खुप अभिमानाची गोष्ट आहे. एवढे यश आत्तापर्यंत फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही अभिनेत्याला मिळाले नाही. पण दादा कोंडके यांना मात्र हे यश मिळाले आणि जगाने या यशाची नोंद देखील घेतली.

दादा कोंडके यांचे चित्रपट तयार होऊन रिलीज होणे. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. कारण त्यांच्यासाठी या प्रवासात खुप अडथळे असायचे. दादा कोंडकेचे चित्रपट नेहमी सेन्सर बोर्डाकडे आडकायचे.

कारण त्यांच्या चित्रपटात खुप वेगळे डायलॉग्स असायचे. ज्यावरून नेहमी सेन्सर बोर्ड आणि दादा कोंडके यांच्यामध्ये वाद व्हायचे. पण शेवटी हा वाद मिटायचा आणि त्यांचे चित्रपट रिलीज व्हायचे. सेन्सर बोर्ड आणि दादा कोंडके यांच्यातला वाद हा मजेशीर किस्सा असायचा.

त्यामूळे या वादातूनही अनेक गोष्टी लोकांसमोर यायच्या. त्यामूळे दादा कोंडके यांचे अनेक किस्से खुप प्रसिद्ध आहेत. दादांनी आपल्या आत्मचरित्राच्या त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

बालपणापासूनच खोडकर स्वभावाच्या दादांचे शिक्षणात मात्र फारसे मन रमले नाही. त्यामुळे त्यांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मुंबईतच श्रीकृष्ण बँड पथकात वादकाचे काम केले.याच काळात त्यांचा विविध सामाजिक चळवळींशी संपर्क आला.

त्यातूनच ते राष्ट्र सेवा दलाशी जोडले गेले. त्यांना राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात काम मिळाले. या पथकात ते शाहीर म्हणून नावारूपास आले. या काळात राम नगरकर, निळू फूले आदी कलाकार त्यांचे सहकारी होते.

दादांनी १९७१ मध्ये ‘सोंगाड्या’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाने अभूतपूर्व असे यश मिळाले. या चित्रपटाने लोकप्रियता संपादन केली आणि मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला विनोदाचा बादशाह मिळवून दिला.

हे ही वाचा –

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दाऊद इब्राहीमला आमिर खानने ‘असा’ दिला होता चकवा

…म्हणून प्रियंका चोप्राने दोन चित्रपटांनंतर सलमान खानसोबत काम केले नाही

साध्या डान्सरच्या प्रेमात वेडी झाली जान्हवी कपूर, दोघांच्या डेटचा लाइव्ह व्हिडीओ व्हायरल

भोळ्याभाबड्या पाठक बाईंचा मैत्रीणींसोबत भन्नाट डान्स; व्हिडीओ पाहून म्हणाल ह्या नक्की पाठक बाईच का?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.