Homeइतरबापरे! 'या' भन्नाट ट्रिक्समुळे गुगल पे वरती मिळणार आता वारंवार बंपर कॅशबॅक...

बापरे! ‘या’ भन्नाट ट्रिक्समुळे गुगल पे वरती मिळणार आता वारंवार बंपर कॅशबॅक…

गुगल पे हे कमी कळताच अतिशय लोकप्रिय प्लॅटफॉर्म बनलेले आहे, ज्याच्या मदतीने लोक एका सेकंदातच सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकतात. तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा तुम्ही Google Pay वापरण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्हाला त्यावर भरपूर कॅशबॅक तसेच जोरदार रिवॉर्ड देखील मिळतात, परंतु कालांतराने ते कमी होते. असे का घडते, आणि कॅशबॅक पुन्हा कसा मिळवता येईल याबद्दल माहिती घेऊयात.

तर आता आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही या अँपचा वापर करून पेमेंटवर भरपूर कॅशबॅक जिंकू शकता जसे की सुरुवातीला तुम्हाला मिळत होता. हे प्लॅटफॉर्म वापरताना अनेक लोक अनेक चुका करतात आणि त्यामुळेच त्यांचा कॅशबॅक कमी होत जातो. आज आम्ही तुमच्यासाठी या समस्येचे निराकरण करण्याचा सर्वोत्तम मार्ग घेऊन आलो आहोत.

जर तुम्हाला बंपर कॅशबॅकचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही एकाच खात्यावर वारंवार होणारे व्यवहार करणे थांबवावे. जर तुम्ही एकाच खात्यावर वारंवार व्यवहार करत असाल तर, तुमचा कॅशबॅक कमी होतो. तुम्ही वेगवेगळ्या खात्यांवर पैसे भरल्यास तुम्हाला चांगला कॅशबॅक आणि उत्तम रिवॉर्ड मिळण्याची शक्यता जास्त आहे.

जर तुम्ही एकाच खात्यावर एकाच वेळी खूप मोठा व्यवहार करत असाल तर असे करू नका, तुम्ही थोडा वेळ थांबून त्या खात्यावरील रकमेचे व्यवहार करा. तुम्हाला मोठ्या रकमेवर अपेक्षित कॅशबॅक मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही कमी रकमेचा व्यवहार करावा.

जर तुम्ही नगण्य व्यवहार असलेल्या खात्यावर व्यवहार करत असाल, तर तुम्ही अशा खात्यावर व्यवहार करू नये, यामुळे तुम्हाला कॅशबॅक आणि रिवॉर्ड मिळण्याची शक्यता कमी होते. फक्त अशाच खात्यांवर व्यवहार करा जे Google pay चा जास्त वापर करत राहतात.

तसेच, तुम्ही जर एक अंकी रक्कम भरत असल्यास, तुम्हाला कॅशबॅक आणि बक्षिसे मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. व्यवहार किमान १०० ते ५०० रुपयांचा असावा यासाठी प्रयत्न करा. सध्या अनेक ठिकाणी व्यवहारासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. या व्यवहारादरम्यान अनेक उत्तम प्रकारचे रिवॉर्ड मिळतात याद्वारे तुम्हांला विशिष्ट वस्तूंची खरेदी करताना फायद्याचे ठरत असते.

महत्वाच्या बातम्या
कादर खान यांनी दिलेल्या या अटी पुर्ण करताना ढसाढसा रडले होते दिलीप कुमार, वाचा भन्नाट किस्सा
गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट कोणी आणि कुठे रचला होता? वाचा इनसाईड स्टोरी
माजी IAS अधिकाऱ्याने सम्राट अशोकाची केली औरंगजेबाशी तुलना, आता होते पद्मश्री मागे घेण्याची मागणी