बापरे! माकडासमोर पाऊट करणं तरुणीला पडलं महाग; तरुणीसोबत जे घडलं ते पाहून तुम्हीही हादराल

मुंबई। आजकाल सोशल मीडियावर लोक प्रचंड सक्रिय असतात. अगदी लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच सोशल मीडियाचा प्रचंड वापर करतात. सध्या सोशल मीडिया हे प्रसिद्धीचं साधन बनल्याने हजारो लोक दिवसाला यावर फोटोज व व्हिडिओज शेअर करत असतात.

युजर्स जे व्हिडिओ शेअर करतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात डान्सचे व्हिडिओ असतात. बरेचसे व्हिडिओ हे एवढे व्हायरल होतात की अनेजण रातोरात स्टार होतात. मात्र काही व्हिडिओ हे असतात असतात की ते पाहून हसून हसून अनेकांना हैराण व्हायला होतं.

असाच एक सध्या व्हिडिओ व्हायरल होत असू यामध्ये एक तरुणी माकडासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र फोटो काढणं तरुणीला महागात पडलं आहे. हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आहे की प्रचंड प्रमाणात या व्हिडिओला अनेकजण शेअर करत आहेत.

आपण ज्यावेळी अनेक ठिकाणी फिरायला जातो त्यावेळी बऱ्याचदा आपल्याला रस्त्यात माकडं दिसत असतात. व त्यावेळी बरेच जण माकडांसोबत फोटो काढत असतात. अशीच एक तरुणी माकडासोबत ती फोटो काढायला गेली. फोटो काढताना तिने पाऊट केलं पण तरुणीने पाऊट केलेलं पाहून माकडाने त्या तरुणाच्या तोंडावर उडी घेतली आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तरुणी माकडाजवळ जाऊन फोटोसाठी पोझ देऊन उभी राहते. कुणीतरी समोरून तिचं फोटो काढते आहे. माकडाच्या जवळ ती जाते आणि आपली दोन बोटं दाखवत पाऊट करते.

त्यावेळी माकड तिच्याकडे पाहतं आणि तिच्यावर उडी घेतं. तिच्या खांद्यावर बसतं, तिचं नाक-तोंड दाबतं, केस खेचण्याचाही प्रयत्न करते. तरुणी किती तरी वेळ माकडाच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करते. पण माकडाने तिला इतकं घट्ट पकडलं आहे की तिला त्याच्या तावडीतून सुटताच येत नाही.

व शेवटी तरुणीच नशीब चांगलं म्हणून त्या माकडाला बांधून ठेवले होते. त्यामुळे या तरुणीची माकडाच्या तावडीतून सुटका झाली आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ videolucu.funny इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत असून या व्हिडिओवर कमेंट्स येत आहेत. तसेच अनेकजण या व्हिडिओनंतर या तरुणीची खिल्ली उडवत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.