बापरे! पुण्यात महापौरांनंतर उपमहापौर अन् तब्बल ६ नगरसेवकांना कोरोनाची लागण

 

पुणे। दिवसेंदिवस पुण्यातील कोरोनाबाधित रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाल्याची बातमी ताजी असतानाच अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पुण्यात महापौरांपाठोपाठ आता उपमहापौर तसेच विरोधी पक्षनेत्यासह सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय पुण्यातील दोन खासदार आणि चार आमदार हे होम क्वारंटाईन झाले आहेत.

त्यामुळे पुणे शहर चांगलेच हादरले असून परिसरातील राजकीय क्षेत्र धास्तावले आहे. तसेच पालिकेच्या तब्बल २०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याने पालिका कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली होती.

त्यानंतर आता सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याने अनेक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम कमी केले आहेत. त्यासोबत काहींनी तर घराबाहेर पडणेही बंद केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.