बापाने ट्रक चालवून क्रिकेटर केले, आज बापाचं स्वप्न पुर्ण करण्याची वेळ आली पण कोरोनाने घात केला

सध्या कोरोनामुळे अनेकांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत. आता यावर्षी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. यामुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यामुळे त्यांच्या कुटूंबीयाला एकच धक्का बसला. यंदाची आयपीएल स्थगित केल्यानंतर तो घरी गेला होता, त्याचा वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्यांच्या जाण्याने वडिलांसाठी घर बांधायची त्याची इच्छा अपूर्ण राहिली आहे. आयपीएलच्या लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने त्याला १.२ कोटी रुपयांत संघात घेतले होते. यामुळे त्याच्या घरचे आनंदात होते. याच पैशांमधून तो आत घर बांधणार होता.

मी कुटुंबातील एकमेव व्यक्ती पैसे कमावत आहे आणि क्रिकेट हेच माझ्या उत्पन्नाचे एकमेव स्त्रोत आहे, असेही त्याने सांगितले होते. वडिलांना कोरोना झाल्यापासून तो खुप पळापळ करत होता, तो रूग्णालयाच्या बाहेरील बाकावर बसून राहायचा.

अत्यंत गरीबीतून त्याने हा प्रवास केला होता. चेतनचे वडील ट्रक ड्रायव्हर होते. खेळण्यासाठी लागणारे साहित्य देखील त्याच्याकडे उपलब्ध नव्हते. मात्र अशा परिस्थितीमध्ये तो इथपर्यंत आला. आणि त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली.

त्याने एका मुलाखतीदरम्यान अनेक गोष्टी उलघडून सांगितल्या. भावसिंहजी क्रिकेट अकादमीने क्रिकेट शिकवण्याची फी सुद्धा घेतली नव्हती. त्यामुळे तो इथपर्यंत आला, असेही त्याने सांगितले.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राकडून काहीतरी शिका; लता मंगेशकर व जावेद अख्तर यांनी केंद्राला सुनावले

चांगले उपचार मिळाले असते तर वाचलो असतो म्हणत अभिनेत्याने सोडले प्राण; शेवटची पोस्ट वाचून डोळ्यात पाणी येईल

करीना कपूरने विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला म्हातारी म्हणून हिणवले; वाचा पूर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.