तौक्तेनंतर आता चक्रीवादळ ‘यास’चा मोठा धोका, भारतीय हवामान विभागाने दिला हा इशारा

मुंबई | नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळानंतर आणखी एका चक्रीवादळाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या २४ तासात हे चक्रीवादळ मोठ्या भयंकर वादळात रुपांतरीत होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचं २५ मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळास यास असे नाव देण्यात आले आहे. यास चक्रीवादळाची २५ मे पासून तीव्रता वाढून ते अतीतीव्र चक्रीवादळ बनेल. वारे ताशी ११८ ते १६५ किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

२६ मे च्या संध्याकाळपर्यंत भारताच्या मुख्य भुमीच्या पूर्व किनाऱ्याला यास चक्रीवादळ धडकेल. सध्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. बंगाल आणि उत्तर ओडिशासोबतच शेजारच्या बांग्लादेशाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थिचा सामना करण्यासाठी वायु सेना आणि तटरक्षक दल दक्ष झाले आहे. यासाठी भारतीय नौदलाला चार डायव्हर्स आणि १० बचाव तुकड्यांची कोलकाता, भुवनेश्वर आणि चिलिका येथे मदत फौज तैनात करण्यात आली आहे.

तौक्ते चक्रीवादळानंतर आठ दिवसातच भारताला दुसऱ्या चक्रीवादळाचा सामना करावा लागणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे ३१ मे पर्यंत मान्सून केरळ आणि पाच जून पर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. तर मान्सून महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या-
1 ते 5 कोटीपर्यंतचे कर्ज मिळणार चुटकीसरशी; घ्या अधिक जाणून
तमिळनाडूच्या या पठ्ठ्याने लग्नासाठी विमानचं केलं बुक, अन् हवेतच बांधली लग्नगाठ; पाहा व्हिडिओ
अरे बापरे! घोड्याच्या अंत्यसंस्कारासाठी जमली हजारोंची गर्दी, कोरोना नियम पायदळी; पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.