सध्या ग्राहकांची ऑफरच्या(Offer) नावाखाली सरार्स लूट केली जात आहे. दिवाळी, दसरा किंवा इतर सणाच्या निमित्ताने दुकानदार महाधमाका सेल(Sale), ऑफर देतात. या सेल, ऑफरमुळे ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे. एखादी वस्तू खरेदी करताना त्या खरेदीची पावती न घेतल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. या फसवणुकीविरोधात ग्राहक(Customer) तक्रार देखील करत नाहीत.(customer cheated by offers or sale which are given by stores)
ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीमधून हे समोर आलं आहे. महाराष्ट्रातील जालना जिल्हा उद्योग नगरी, बियाणे नगरी म्ह्णून ओळखला जातो. बाजारामधील आर्थिक उलाढाल ही कोटींच्या घरात असते. दुकानातून अथवा बाजारामधून वस्तू खरेदी करताना ग्राहकाने खरेदीची पावती घेणे गरजेचे असते. पण ग्राहक याबाबतीत सजग नसतात.
तक्रार निवारण आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, कोणतीही वस्तू खरेदी करताना त्या वस्तूच्या खरेदीची पावती घेणे आवश्यक आहे. अनेक महागड्या वस्तू घेत असताना (उदा. इलेक्ट्रॉनिक वस्तू) ग्राहक पावती घेत नाहीत. कापड, किराणा आणि औषध यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंची खरेदी करताना देखील ग्राहक दुकानदाराकडे पावती मागत नाहीत.
दुकानदार सण, उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ऑफर, सेल जाहीर करतात. या ऑफर, सेलच्या जाहिराती ग्राहकांना भुलवून टाकणाऱ्या असतात. या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केली जाते. उद्योग, किराणा दुकाने, मेडिकल अशा अनेक ठिकाणी ग्राहकांची मोठी फसवणूक होत असल्याचे जिल्हा ग्राहक पंचायतीने सांगितले आहे.
या फसवणुकीविरोधात ग्राहकांना जागृत करण्यासाठी ग्राहक पंचायतीने ‘जागो ग्राहक जागो’ हे अभियान राबविले आहे. पण ग्राहक या अभियानाकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या बाजारात गोडेतेलाची एक ऑफर सुरु आहे. या ऑफरमध्ये दुकानदारांनी २१० रुपयांची एक लीटर गोडेतेलाची पिशवी १६० रुपयांत मिळणार,अशी जाहिरात केली आहे.
या ऑफरमध्ये ग्राहकांना फायदा होण्याऐवजी त्यांची फसवणूक होत असल्याचे ग्राहक पंचायतीने उघड केले आहे. ग्राहकाने एखादी वस्तू खरेदी केली तर जीएसटीनुसार पावती द्यायची असेल तर ग्राहकाला जास्त पैसे आकारले जातात, त्यामुळे ग्राहक पक्की पावती घेत नाहीत. अशा प्रकरणात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. तरीसुद्धा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करत नाहीत.
महत्वाच्या बातम्या :-
‘काही लग्नांच्या गाठी स्वर्गात नाही, नरकात बांधल्या जातात’, जोडप्याच्या वादावर हायकोर्टाची संतप्त प्रतिक्रिया
“हिंदुस्तानी भाऊला सोशल मीडियावर प्रस्थापित करून त्याला फेमस करणारी कंपनी भाजप”
एकुलत्या एक मुलीचा गिझर मधून गॅस गळती झाल्याने मृत्यू; आईने फोडला हंबरडा