बॅंकेच्या नियमांप्रमाणे खात्यात कमीतकमी रक्कम शिल्लक असायला हवी. बँकेच्या खात्यात रक्कम शिल्लक न ठेवल्यास पैसे कट झाल्यामुळे संतापलेल्या माथेफिरने बँक मॅनेजरवर चाकूने हल्ला केला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ही घटना रांच येथे घडली आहे. ही घटना इतक्या अचनाकपणे झाली की सगळ्यांचा गोंधळ उडाला. आरोपी ग्राहक या घटनेनंतर फरार झाला असून पोलीस तपास सुरू आहे. स्थानिक पोलिसांनी यासंबंधीची माहिती दिली असून घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
रांची येथील कांटा टोली येथे राष्ट्रीयकृत बँकेत ही घटना घडली आहे. बँकेच्या खात्यात कमीतकमी रक्कम शिल्लक हवी हा नियम आहे. परंतु चिंटू उर्फ फिरोज नावाच्या ग्राहकाला खात्यात कमी रक्कम असल्यामुळे बँकेने त्याला चार्ज लावला. याचा त्याला राग येत त्याने हे कृत्य केले आहे.
बँकेने चार्ज लावल्यामुळे फिरोज संतापला होता आणि दररोज बँकेत येऊन वाद घालत होता. जवळजवळ सहा महिने हा वाद सुरू होता. शुक्रवारी फिरोज बँकेत आला मॅनेजरच्या कॅबिनमध्ये शिरला आणि नंतर त्याने बँकेच्या मॅनेजरशी वाद घालायला सुरवात केली.
हा वाद इतका टोकाला गेला की फिरोजने त्याच्याजवळ असलेला चाकू काढला आणि मॅनेजरवर हल्ला केला. मॅनेजरवर फिरोजने अनेकवेळा वार केलेत. या घटनेत मॅनेजरला जबर दुखापत झाली आहे. बँकेच्या इतर कर्मचारी आणि उपस्थित ग्राहकांच्या काही लक्षात येईपर्यंत तो माथेफिरू आरोपी फरार झाला होता.
या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज मधुन फरार आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. जखमी मॅनेजरला दवाखान्यात नेण्यात आले असून या घटनेमुळे बँकेत तसेच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
Cyber: सावधान! अनोळखी ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावताय? काही मिनीटात बँक खाते होईल रिकामे
५०० च्या नोटेबाबत मोठी बातमी! RBI करणार मोठा बदल, ताबडतोब बँकेत जा अन् करा ‘हे’ काम
वाघाचा ट्रेनरवर हल्ला, आधी खाली पाडलं मग जबड्यात पकडली मान अन् मग…; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ