लक्षणे जाणवल्यास लगेच सीटी स्कॅन करू नका, ऑक्सिजन ९५च्या खाली असेल तरच करा-तात्याराव लहाने

मुंबई । संपूर्ण राज्य सध्या कोरोनाशी दोन हात करत आहे. काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. मात्र लॉकडाऊन केल्याने या रुग्णसंख्येत आता घट होताना दिसत आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, मागच्या दोन आठवड्याशी तुलना केली तर राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. यामुळे हे दिलासादायक आहे.

असे असले तरी अजूनही २४ जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम आहे. यामुळे हे संकट अद्यापही टळले नाही. ही रुग्णसंख्या कमी करण्याचे आवाहन आपल्यासमोर आहे. असेही राजेश टोपे म्हणाले.

तसेच कोरोना परिस्थितीवर डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी आपली प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसांपासून सिटी स्कॅनचा मुद्दा गाजत आहे. यावर ते म्हणाले, लक्षणे जाणवल्यास लगेच सीटी स्कॅन करू नये.

यामध्ये ऑक्सिजन लेव्हल ९५ पेक्षा खाली असेल तरच सिटी स्कॅन करा, असेही डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले आहे. केवळ सिटी स्कॅन करून उपचार केले जातात, मात्र असे न करता टेस्ट करूनच उपचार करावेत असेही ते म्हणाले.

सिटी स्कॅनचे रेडिएशन हे अपायकारक आहे, येणाऱ्या काळात सिटी स्कॅनचे वाढते प्रमाण हे धोकादायक ठरू शकते. यामुके कॅन्सरचा धोका देखील वाढू शकतो. यामुळे सिटी स्कॅन करण्यासाठी काही निकष आहेत.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना २ रुपये दरवाढ! गोकुळ जिंकताच सतेज पाटलांची मोठी घोषणा

पाटील आणि मुश्रीफ गटाने गोकुळ दूध संघाची निवडणूक जिंकली, महाडीक गटाच्या सत्तेला सुरूंग

शिक्षकांनी हाती घेतला समाजसेवेचा वसा; कोरोना रुग्णांसाठी उभारलं ७० ऑक्सिजन बेडचं कोविड सेंटर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.