…तरच सिटी स्कॅन करा! नाहीतर होईल कॅन्सर; डॉ. तात्याराव लहाने यांची माहिती

मुंबई । राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यामुळे  आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. मात्र लॉकडाऊन केल्याने या रुग्णसंख्येत आता घट होताना दिसत आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, मागच्या दोन आठवड्याशी तुलना केली तर राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. यामुळे हे दिलासादायक आहे.

असे असले तरी अजूनही २४ जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम आहे. यामुळे हे संकट अद्यापही टळले नाही. ही रुग्णसंख्या कमी करण्याचे आवाहन आपल्यासमोर आहे. असेही राजेश टोपे म्हणाले.

तसेच कोरोना परिस्थितीवर डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी आपली प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसांपासून सिटी स्कॅनचा मुद्दा गाजत आहे. यावर ते म्हणाले, लक्षणे जाणवल्यास लगेच सीटी स्कॅन करू नये.

यामध्ये ऑक्सिजन लेव्हल ९५ पेक्षा खाली असेल तरच सिटी स्कॅन करा, असेही डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले आहे. केवळ सिटी स्कॅन करून उपचार केले जातात, मात्र असे न करता टेस्ट करूनच उपचार करावेत असेही ते म्हणाले.

सिटी स्कॅनचे रेडिएशन हे अपायकारक आहे, येणाऱ्या काळात सिटी स्कॅनचे वाढते प्रमाण हे धोकादायक ठरू शकते. यामुके कॅन्सरचा धोका देखील वाढू शकतो. यामुळे सिटी स्कॅन करण्यासाठी काही निकष आहेत.

ताज्या बातम्या

मुलाचे चित्रपट कमवतात ४०० कोटी परंतु वडील आजही चालवितात बस; जाणून घ्या कारण

आश्चर्यकारक! २५ वर्षीय महिलेने एकाच वेळी ९ बाळांना दिला जन्म

तांदळापासून बनवलेला ‘हा’ ‘फेसपॅक’ वापरल्यास क्षणात चेहरा दिसेल इतका गोरा की सर्व क्रिम कचऱ्यात फेकून द्याल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.