वेस्ट इंडिजविरुद्धच्या(West Indies) तीन सामन्यांत १० विकेट घेऊन मालिकावीरचा किताब जिंकणाऱ्या प्रसिद्ध कृष्णा(Prasidh Krushna) हा खेळाडू आयपीएलच्या लिलावात मालामाल झाला आहे. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्स(Rajsthan Royals) संघाने वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला १० कोटींना विकत घेतले आहे. तर गुजरात टायटन्स संघाने लॉकी फर्ग्युसनला १० कोटींना खरेदी केले.(csk player dipak chehar get 14 corers in ipl auction2022)
वेगवान गोलंदाज दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्स संघाने १४ कोटी रुपयांना पुन्हा विकत घेतले. त्यामुळे दीपक चहर पुन्हा एकदा पिवळ्या रंगाच्या जर्सीत चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवला आयपीएल २०२२ च्या लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल लिलावात ७. ७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तर इंग्लंडच्या संघातील मार्क वुडला लखनौ सुपरजायंट्स या संघाने ७.५० कोटी रुपयांना विकत घेत बाजी मारली आहे. २०२२ च्या आयपीएलच्या मेगा लिलावात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला कोणताही खरेदीदार मिळाला नाही.
भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन हा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील युवराज सिंगनंतर दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. इशान किशनला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली होती. या लिलावाच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने बाजी मारत इशान किशनला १५ कोटी २५ लाखांना पुन्हा विकत घेतले.
फलंदाज इशान किशनची मूळ किंमत दोन कोटी होती. २०११ च्या विश्वचषकात भारताच्या विजयाचा नायक ठरलेल्या युवराज सिंगला २०१५ च्या हंगामापूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने विक्रमी १६ कोटी रुपयांना विकत घेतले होते. एका वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला १४ कोटींना खरेदी केले. यापूर्वी भारताचा स्टायलिश फलंदाज श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्स संघाने १२ कोटी २५ लाखांना विकत घेतले होते.
सर्वात धक्कादायक म्हणजे डावखुरा फलंदाज सुरेश रैना या खेळाडूला आयपीएलच्या या लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर ५५२८ धावा आहेत. आयपीएलमध्ये डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने एक शतक आणि ३९ अर्धशतके केली आहेत. तरीही या लिलावात चेन्नई सुपर किंग्जच्या या माजी खेळाडूला कोणताही खरेदीदार मिळाला नाही.
महत्वाच्या बातम्या :-
कट्टर शिवसैनिकावर आलीये वाईट वेळ, हळद-कुंकू विकून भरतोय पोट, वाचा ह्रदयद्रावक कहाणी
घटस्फोटाच्या दिवशीच खासदाराने १८ वर्षीय मुलीशी केले तिसरे लग्न, लग्नाचा फोटोही केला पोस्ट
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझरने जिंकले सर्वांचे मन, या दिवशी चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित