HomeखेळCSK चा कर्णधार बदलणार; संघाला एकहाती IPL जिंकवून देणारा 'हा' खेळाडू घेणार...

CSK चा कर्णधार बदलणार; संघाला एकहाती IPL जिंकवून देणारा ‘हा’ खेळाडू घेणार धोनीची जागा

आयपीएल 2022 साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. यासाठी चेन्नई सुपर किंग्ज (CSK)च्या टीमनेही आगामी स्पर्धेसाठी पूर्ण तयारी केली आहे. यावेळी, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे हे शेवटचे आयपीएल असेल. त्यामुळे आता यानंतर धोनीचा उत्तराधिकारी कोण असेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने चार वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. धोनीने चेन्नईमध्ये आयपीएलचा सामना खेळून निवृत्त होणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलेलं आहे. मागील दोन सिझन मध्ये धोनीला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, यावर्षी पूर्ण सिझन भारतामध्येच होणार असल्यानं धोनीला संघासोबत सामना खेळण्याची संधी मिळणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज च्या संघाने धोनीला येणाऱ्या सामन्यात रिटेन केले आहे. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या सामन्यात तोच चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे, असा सर्वांचा अंदाज आहे. मात्र, येणाऱ्या सिझन मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार बदलू शकतो. धोनीच्या जागी कोणा दुसऱ्याची कर्णधारपदी नेमणूक होऊ शकते.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड याचा समावेश आहे. यांनी गेल्या सिझन मध्ये संघाच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय विदेशी खेळाडूंमध्ये अष्टपैलू मोईन अलीची निवड करण्यात आली आहे.

रवींद्र जडेजाला या संघात नंबर वन खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. नंतर धोनीचा क्रमांक लागतो. मोईन अली तिसऱ्या क्रमांकाचा तर ऋतुराज गायकवाड या संघातील चौथ्या क्रमांकाचा उत्तम खेळाडू आहे. या सर्वांचीच या संघातील कामगिरी अतिशय उत्तम आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघातील ऑल राऊंडर म्हणून रविंद्र जडेजा ची ओळख आहे. जडेजाला चेन्नई सुपर किंग्जने धोनी पेक्षा जास्त किंमत देऊन रिटेन केले आहे. राजस्थान रॉयल्सनं आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनमध्ये जे विजयपद पटकावलं होतं त्यात जडेजाचा मोलाचा वाटा आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे एकूणच तो टीमचा मुख्य ऑल राऊंडर असून, तोच चेन्नई सुपर किंग्जचा पुढील कर्णधार होऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे.

महत्वाच्या बातम्या
माजी IAS अधिकाऱ्याने सम्राट अशोकाची केली औरंगजेबाशी तुलना, आता होते पद्मश्री मागे घेण्याची मागणी
‘या’ देशात भाऊ-बहिणीतील सेक्सवर लागणार निर्बंध, अनाचाराविरोधात आणणार नवा कायदा
फटे स्कॅम’ प्रकरणात विशाल फटेचे वडील, भाऊ ताब्यात; वाचा कसा झाला कोट्यावधींचा घोटाळा