Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

रुपाली पाटलांच्या मेळाव्याला तुफान प्रतिसाद; भाजप-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार

Dhanashri Rout by Dhanashri Rout
November 27, 2020
in ताज्या बातम्या, इतर, राजकारण, राज्य
0
मनसेच्या पदवीधर उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी, ‘आमदार होण्याचा प्रयत्न करु नको, नाहीतर…’

मुंबई | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडल्या जाणाऱ्या सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक आता रंगात आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकीत महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा रुपाली पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

तसेच रूपाली पाटील-ठोबरे यांना मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांतून तरुण पदवीधर मतदारांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत रूपाली पाटील-ठोबरे यांनी केलेल्या दौऱ्यात घेण्यात आलेल्या मेळाव्याला झालेली गर्दी विरोधकांची डोकेदुखी वाढवणार असल्याचे दिसत आहे.

रूपाली पाटील-ठोंबरे यांना ओळखणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. याचबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मानणारा मोठा तरुणवर्ग आहे. याचा फायदा रूपाली पाटील-ठोंबरे यांना या निवडणूकीत होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अरुण लाड, भाजपचे संग्रामसिंह देशमुख, आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.  आता या निवडणूकीची रंगत आणखीन वाढू लागली आहे.

रुपाली पाटील यांनी महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारावर निशाणा…
“महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार हे आजोबा आहेत. कारण त्यांचे वय ७५ वर्ष आहे. तर भाजपचे उमेदवार म्हणजे बुडीत कारखानदार आहेत. कारण त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे पैसे बुडविले आहेत. ज्यांना पदवीधरांचे ज्ञान नाही, अशा नेत्यांनी या लोकांना उमेदवारी देणे म्हणजे पदवीधरांचा अपमान आहे”, अशी टिका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती.

मनसेचा आक्रमक आवाज…
मनसेचा आक्रमक आवाज म्हणून रुपाली पाटील यांची ओळख आहे. पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची बाजू घेऊन त्या अनेकदा आक्रमक झालेल्या आपण पाहिल्या आहेत. तसेच कोरोनाच्या काळात अनेक रुग्णालयांना त्यांनी भेटी देऊन तेथील गैरप्रकार उघडकीस आणले होते.

महत्त्वाच्या बातम्या
Google Pay द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी द्यावं लागणार शुल्क; जाणून घ्या सविस्तर
‘उध्दव ठाकरे मराठाद्वेषी! ते मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही’
सज्ञान मुलीला कोणासोबतही आणि कुठेही राहण्याचा अधिकार, पालकही तिला रोखू शकत नाही

Tags: mnseraj thackerayRupali patilअरुण लाडपुणे पदवीधर निवडणूकपुणे पदवीधर मतदारसंघरूपाली पाटील-ठोबरेसंग्रामसिंह देशमुख
Previous Post

Google Pay द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी द्यावं लागणार शुल्क; जाणून घ्या सविस्तर

Next Post

कर्णधारपदी रोहित की विराट? गौतम गंभीर आणि आकाश चोप्रा लाईव्हशोमध्ये भिडले

Next Post
कर्णधारपदी रोहित की विराट? गौतम गंभीर आणि आकाश चोप्रा लाईव्हशोमध्ये भिडले

कर्णधारपदी रोहित की विराट? गौतम गंभीर आणि आकाश चोप्रा लाईव्हशोमध्ये भिडले

ताज्या बातम्या

….म्हणून शरद पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक करू वाटते; पंकजा मुंडेंनी सांगितली ‘मत की बात’

….म्हणून शरद पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक करू वाटते; पंकजा मुंडेंनी सांगितली ‘मत की बात’

January 23, 2021
खाजवत बसु नका! ‘हा’ घरगुती उपाय करून मिळवा खाज, खरूज, गजकर्णपासून सुटका

खाजवत बसु नका! ‘हा’ घरगुती उपाय करून मिळवा खाज, खरूज, गजकर्णपासून सुटका

January 23, 2021
हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे; संभाजी भिडे यांचे मोठे वक्तव्य

हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे; संभाजी भिडे यांचे मोठे वक्तव्य

January 23, 2021
ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी संजिवनी आणणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्वीट करत भारताचे मानले आभार

ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी संजिवनी आणणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्वीट करत भारताचे मानले आभार

January 23, 2021
प्रेमभंगात भाईचा दिलजले झाला! खचून न जाता सुरू केला दिल टूटा आशिक कॅफे; आता नुसता राडा सुरूय

प्रेमभंगात भाईचा दिलजले झाला! खचून न जाता सुरू केला दिल टूटा आशिक कॅफे; आता नुसता राडा सुरूय

January 23, 2021
तेव्ह महात्मा गांधीनाही पत्कारावी लागली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासमोर हार

तेव्ह महात्मा गांधीनाही पत्कारावी लागली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासमोर हार

January 23, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.