शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नाला तुफान गर्दी; कोरोना नियम नेमके कुणासाठी?

मुंबई : करोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस चिंतेत भर टाकू लागली आहे. फेब्रुवारीपासून करोनाच्या दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं होतं. त्यानंतर संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, देशभरात मागील २४ तासांत ९३ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, नव्या वर्षातील सर्वात मोठी रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे.

तसेच अशा परिस्थितीत राज्यात लॉकडाऊन लावण्यात येण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.  मात्र, पुन्हा लॉकडाउन करण्याला आता विरोध होताना दिसत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वाले यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात मोठी गर्दी दिसून आली.

मुख्यमंत्री सर्वसामान्यांना कोरोनाचे नियम पाळण्यासाठी आवाहन करत आहेत. मात्र त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी नियम पाळताना दिसत नाही. यामुळे आता प्रशासन काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

वाचा नेमकं काय आहे प्रकरण…
कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले, शालिनी वायले यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात एकच गर्दी दिसून आली.

या लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्स तर सोडाच अनेकांच्या तोंडावर मास्क देखील नव्हते. विशेष म्हणजे लग्न समारंभासाठी वेळेची मर्यादा देखील आखुन दिली असताना वेळेच्या मर्यादेचंही उल्लंघन करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना, ११ रुद्राक्ष महापुजन करत राष्ट्रवादी सेवादलाचे देवाला साकडे

माझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना एका झटक्यात बरा करतो; डॉक्टरचं थेट आयुष मंत्रालयाला आवाहन

किशोर कुमारने दिली होती जितेंद्रला धमकी; माझ्या बायकोपासून लांब राहा नाही तर…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.