सोलापुरात कोरोना नियमांची ऐशी तैशी; काँग्रेसच्या युवा नेत्याच्या अंत्यसंस्काराला जमली तुफान गर्दी 

सोलापुर | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अंत्यसंस्कार, विवाहसोहळे गर्दी न करता पार पाडण्यास सांगितलं आहे. राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी कडक पावलं उचलत आहे आणि असं असतानाच सोलापुरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सोलापुरातील कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे यांचे पती युवा सामाजिक  कार्यकर्ते करण म्हेत्रे यांचे निधन झाले होते. मात्र त्यांच्या निधनानंतर  निरोप देण्यासाठी अंत्यसंस्काराला हजारोंच्या संख्येने गर्दी जमली होती.

सोलापुरात करण म्हेत्रेने ताडी विरोधात आवाज उठवत अनेकांच्या मनावर छाप पाडली होती. तसेच ते  आमदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक होते. समाजातील लोकांच्या मदतीला धावून जात असल्याने त्यांच्या निधनानंतर लोकांनी मोठा आक्रोश केला.

करण म्हेत्रे यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले. लोकांना याची माहिती मिळताच अंत्यविधीसाठी लोकांनी एवढी गर्दी केली होती की पोलिसांना गर्दी पांगवणे मुश्किल झाले होते.

पोलिसांनाही एवढ्या गर्दीसमोर काहीच करता आले नाही.  एवढ्या मोठ्या संख्येत सोशल डिस्टन्सिंगचा  नियम तर पायदळी तुडवला गेला होता. अनेकांच्या तोंडाला मास्कही लावलेला नव्हता. पोलिसांनी वारंवार गर्दी करू नका असं सांगितलं मात्र  कुणीही ऐकलं नाही.

सोशल मिडियावर अंत्यविधीला गर्दी जमल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. पोलिसांना एवढ्या गर्दीसमोर बघ्याची भूमिका घ्यावी लागली होती. त्यानंतर पोलिसांनी दोनशेपेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
एकाच नवरीच्या दारात उभे राहिले दोन नवरदेव, पाहूणेमंडळी झाले हैराण; जाणून घ्या नेमकं काय घडलं
तिसरी लाट सुरू, मुलाबाळांना जपा! ‘या’ राज्यात १० दिवसात तब्बल १००० मुलांना कोरोना
त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खूपसला; श्रेयस तळपदेचा बाॅलीवूडबाबत धक्कादायक गौप्यस्फोट
सर्वात जवळचा सहकारी राजीव सातवांच्या निधनानंतर राहूल गांधी झाले हळवे; दिली ह्रदयद्रावक प्रतिक्रीया

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.