पाणी पिताना मगरीने धरला बिबट्याचा गळा; अवघ्या काही सेकंदात बिबट्याचा खेळ खल्लास, पहा व्हीडिओ

जंगलात काय होईल काही सांगता येत नाही. शिकारीच शिकार झाल्याचा प्रकार येथे घडला आहे. एक तहानलेला बिबट्या तळ्यात पाणी पिण्यासाठी आला होता. पाणी पीत असताना बिबट्याला अंदाजही नसेल की त्याचा हा शेवटचा घोट आहे.

अवघ्या काही सेकंदात बिबट्या गायब झाला. मगरीने त्याला काही सेकंदात पाण्याच्या आत ओढून नेले. शिकारीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मगर कशा प्रकारे आपल्या शिकारला आपल्या जाळ्यात फसवते हे या व्हिडिओतून दिसत आहे.

समोरच्याला थोडीसुद्धा भनक लागत नाही. बिबट्याला कळायच्या आतच मगर त्याच्यावर हल्ला करते आणि त्याच्या गळ्याला पकडून त्याला तळ्यात ओढून नेते. बिबट्या ज्याला बरेच प्राणी घाबरतात जो सगळ्यांची शिकार करतो त्यालाच मगरीने शिकार बनवले.

मगर इतक्या जलद पद्धतीने हल्ला करते की बिबट्याला सावरण्यासाठी वेळच भेटत नाही. मगरीने इतक्या ताकदीने बिबट्याला पकडलेले असते की बिबट्या धडपडत असतो तडफडत असतो पण त्याला आपला बचाव करता येत नाही.

बिबट्या साठ सेकंदात संपला. हा व्हिडिओ ट्विटरवर एका युजरने शेअर केला आहे. हे दृश्य पाहून व्हीडिओ काढणारादेखील अचंबित झाला होता. या व्हीडिओला तीन हजारपेक्षा जास्त लाईक्स भेटल्या आहेत आणि नेटकऱ्यांनी या व्हीडिओवर आपल्या प्रतिक्रिया बोलून दाखवल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.