दलित महिलांवर अ’त्याचार झाल्यावर रूपाली चाकणकर लिपस्टीक लाऊन कुठे लपून बसते

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी आरपीआय नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याविरोधात टिका केल्याने रूपाली चाकणकरांच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात आरपीआयच्या महिला नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबईतील शेतकरी आंदोलनावर बोलताना शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याची गरज नाही. हा शेतकऱ्यांचा स्टंट आहे असं वक्तव्य केलं होतं. यावरून राष्ट्रवादीच्या रूपालीताई चाकणकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर टीका केली होती.

यावरून आरपीआयच्या महिला नेत्या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. रूपाली चाकणकर यांच्या पुण्यातील घरासमोर आरपीआयच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. तसेच मुंबईतील आझाद मैदानावर त्यांच्या फोटोला काळे फासून निषेध करण्यात आला.

यावेळी रिपाइंच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. आशा लांडगे, मुंबई शहराच्या अध्यक्षा अभया सोनवणे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

मुंबईच्या महिला अध्यक्षा अभया सोनवणे यांनी म्हटले की, दलित महिलांवर अ’त्याचार झाल्यावर रूपाली चाकणकर लिपस्टीक लावून कुठे लपून बसलेली असते. अ’त्याचार झालेल्या दलित महिलांच्या मदतीला कधी चाकणकर बाई आल्यात का? असा सवाल सोनवणे यांनी केला आहे.

दरम्यान पुण्यातही रूपाली चाकणकर यांच्या घरासमोर आरपीआयच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोडे मारत आंदोलन केले होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता आठवले यांनी रूपालीताई चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली हिंसाचारातील ‘व्हिलन’ दीप सिध्दूचा फेसबुक लाइव्ह वरून शेतकरी नेत्यांना इशारा
राजपथावर ‘या’ राज्याच्या चित्ररथाने पटकावला पहिला मान; राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे होतयं कौतुक
पोलिसही हादरले! पत्नीला बळजबरीने कुत्र्यासोबत से’क्स करायला लावायचा आणि…
सुशीलकुमार शिंदेंनी चुकून फोडलं नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचे नाव; पुन्हा केली सारवासारव

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.