उद्धव ठाकरेंवर घाणेरडी टीका करणाऱ्या भाजप नेत्याला शिवसैनिकांनी धू धू धूतले

पंढरपूर | भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपुर्वी वाढीव वीज बिलाविरोधात शहरातील वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात महाविकास आघाडी सरकार विरोधात बोलताना पंढरपुर भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांच्या कुटूंबाविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पंढरपुर शहरातील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी याचा निषेध केला. पंढरपुरातील मंदिर परिसरात एकत्र येत या घटनेचे पडसाद उमटण्यास सूरूवात झाली. भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरीष कटेकर यांना रस्त्यावर ओढत शिवसैनिकांनी जोरदार चोप दिला. त्यानंतर अंगावर ऑइल टाकत गळ्यात साडी टाकून घोषणाबाजी केली. मंदीर परिसरातील पोलिसाने तात्काळ धाव घेत भाजप नेत्याची सुटका केली.

दरम्यान या संपुर्ण घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या घटनेची संपुर्ण पंढरपुर शहरात चर्चा सुरू होती. आगामी काळात भाजप शिवसेनेत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

म्हणून शिवसैनिकांनी त्याला अद्दल घडवली

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराविषयी अगदी खालच्या पातळीवर जावून टिका करूनही पोलिसांनी या भाजप नेत्यावर कोणताच गुन्हा दाखल केला नाही. खरं तर पोलिसांनी कालच गुन्हा दाखल करायला हवा होता पण त्यांनी त्याच्यावर कोणतीच कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्याला धडा शिकवला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी पंढरपुर शहराचे शिवसेना शहराध्यक्ष रवी मुळे यांनी केली आहे.

म्हत्वाच्या बातम्या
भाजपला धक्का! ‘या’ बड्या माजी आमदाराचा पक्षाला रामराम; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
राज ठाकरेंनी सांगितला शेतकरी आंदोलनावर तोडगा काढायचा मार्ग…
फोटो जळताना पाहून मीना हॅरीस संतापल्या; म्हणाल्या “जर आम्ही भारतात राहत असतो तर….’’
वेब सीरिजच्या नावाखाली करायची अ’श्लिल व्हीडिओ शुट; बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला अटक

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.