Share

‘गाढव तुरुंगात जाताच लालपरी मुक्त झाली’, सामनाच्या अग्रलेखातून सदावर्ते यांच्यावर टीका

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काही एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. शरद पवारांच्या घरावर हल्ला करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना चिथावल्या प्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. तसेच छत्रपतींच्या घराण्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अॅड. गुणरत्न सदावर्ते(Adv. Gunratn Sadavrte) यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Criticism of Sadavarte from the headline of the match)

तसेच कोल्हापूर पोलीस ठाण्यात देखील आणखी एका प्रकरणात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. यावरून शिवसेनेने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली आहे. सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शिवसेनेने निशाणा साधला आहे.

या अग्रलेखात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची तुलना थेट गाढवाशी केली आहे. “गाढव तुरुंगात जाताच लालपरी मुक्त झाली, गावागावांत धावू लागली”, अशी टीका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. नुकतंच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात पोलिसांना नोटा मोजण्याची मशीन सापडली. यावर देखील सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे.

‘डंके की चोट पर’ हा गुणरत्न सदावर्ते यांचा परवलीचा शब्द होता. आज सदावर्तेची वरात या न्यायालयातून त्या न्यायालयात. या पोलीस स्टेशनातून त्या पोलीस स्टेशनात सुरु आहे. सदावर्तेला गाढवांची आवड होती. त्याने गाढव पाळले. पण या महान गाढवप्रेमींना कोण पाळत होते हे सुद्धा लोकांसमोर यायलाच हवे, अशी मागणी या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

कायदा हा सामन्यांची कवचकुंडले असतो. सदावर्तेसारखे लोक कायदा आणि संविधानाचा गैरवापर करतात. व सामन्यांना देशोधडीस लावतात. “कायदा गाढव असतो” अशा अर्थाची एक म्हण आहे. सदावर्तेसारखे लोक गाढवच आपल्या दारात बांधतात व मुक्या मेंढरासारखी जनता त्या गाढवाची पूजा करते. गाढव तुरुंगात जाताच लालपरी मुक्त झाली, गावागावांत धावू लागली”, असे सामनाच्या अग्रलेखात म्हंटल आहे.

गुणरत्न सदावर्ते सध्या त्यांच्याच कर्माची फळे भोगत आहेत. अनेक जिल्ह्यांत गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या या महाशयांची गावभर वरात काढल्याचे चित्र दिसत आहे. पण अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वरात निघाल्यापासून एसटी सेवा वेगात सुरु झाली आहे. आतापर्यंत ७५ हजार एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, असे देखील सामनाच्या अग्रलेखात म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या :-
राज्यातील मंत्र्यांचा अजब कारभार! खाजगी रुग्णालयात घेतले उपचार, बिलांची वसुली मात्र सरकारी तिजोरीतून
दंगलखोर समाजाचे नाव सर्वांनाच माहिती आहे, हिंदू कधी दंगल करत नाही; ‘या’ क्रिडापटूचे वादग्रस्त वक्तव्य
पुण्यात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना खजूर अन् मोदक भरवत एकत्र सोडला रोजा अन् उपवास

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now