मुंबई | वादग्रस्त ट्विट करून अभिनेता कमाल आर. खान(केआरके) नेहमीच वादात अडकत असतो. तो वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींवर नेहमीच टीका करताना दिसून येतो. आता पुन्हा एकदा कमाल खान चर्चेत आला आहे. यावेळी त्याने भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.
कमाल आर खानने ट्विट केले आहे. यामध्ये तो म्हणतो, मला १४० कोटी भारतीय जनतेला विचारायचे आहे की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने देशासाठी काय मिळवले आहे? हे दोघे बीसीसीआय नावाच्या खाजगी कंपनीसाठी खेळतात.
I just want to ask 140Cr Indians that what these two @sachin_rt and @imVkohli have achieved for the country? They played for a private company #BCCI. They played for their records to earn hundreds of Crore ₹ per year. What’s more? Nothing. At least @msdhoni won both world cups.
— KRK (@kamaalrkhan) February 20, 2021
सचिन आणि विराट फक्त रेकॉर्ड बनवण्यासाठी खेळतात आणि वर्षाला करोडो रुपये कमवतात. अजून दुसरे काय करत नाहीत. याउलट एम.एस धोनीने किमान वर्ल्डकप तरी जिंकला आहे.
केआरकेने केलेले या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्याने क्रिकेटविश्वातल्या दोन दिग्गजांवर निशाणा साधाला आहे. मात्र यावर नेटकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे.
दरम्यान यापुर्वी सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्विटवरुन आणि आयपीएल लिलाव याबाबत केआरकेने सचिनचा चांगलाच समाचार घेतला होता. यावेळी केआरकेने ट्विट केले होते यामध्ये तो म्हणाला होता, सचिनने शेतकरी आंदोलनाच्या विरोधात ट्विट केले ते त्याच्या मुलाला आयपीएल लिलावात घेण्यासाठी. परंतु त्याला कोणी २ रुपयातही खरेदी करणार नाही.
Dear sir @sachin_rt you tweeted against farmers to put your son on #IPL auction. But nobody bought him even for #2Rs! Finally your boss #Ambani bought him on base price Rs.20 lakhs means MSP. Pls note this is what farmers asking for MSP! Your son is paying for your karma.
— KRK (@kamaalrkhan) February 20, 2021
असे असताना शेवटी तुमच्या बॉस अंबानीने त्याला बेस प्राइस २० लाख रुपयांत खरेदी केले. ही बेस प्राइस म्हणजेच एमएसपीच्या किमतीवर खरेदी केले आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या शेतकरी याच एमएसपीची मागणी करत आहेत. तर तुमच्या मुलाला(अर्जुन तेंडुलकरला) तुमच्या कर्माची किंमत मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन तेंडुलकर, विराट कोहली मोदी सरकारच्या समर्थनार्थ मैदानात
‘या’ बड्या नेत्याचा घणाघात; ‘सचिन तेंडुलकर ‘भारतरत्न’साठी लायक नाही’
सचिन तेंडुलकरने ‘या’ खेळाडूबद्दल केलेले भाकीत ठरले खरे
खुशखबर! फास्ट टॅगमध्ये पैसे असतानाही स्कॅन झाला नाही तर पैसे देऊ नका, वाचा नवा नियम